गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूर मधील एका मदरशाच्या माध्यमातून होतय मुला-मुलींचे लैंगिक शोषण
भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे शहर जिलाध्यक्ष यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
लातुर येथील मदरसा मिशकातल उलुम कोळपा संचालक मौलाना इस्माईल अब्दुल करीम शेख (कास्मी), रा. मदनी नगर, लातूर व मदरसा रोजेतुल मोमिनात लामजना ता औसा, जि. लातूर संचालक अब्दुल वाजीद अब्दुल मजीद शेख, रा. जुना बाभळगाव रोड, लातूर यांच्यावर लैंगिक शोषण केल्याने पोलीस स्टेशन मध्ये 376/377 कलमान्वये गुन्हे दाखल आहेत..
तसेच मदरसा दारूल उलुम सिद्दिकिया आर्वी, ता.जि. लातूर संचालक मौलाना इजराईल, मदरसा अशरफुल उलुम, जुना बाभळगाव रोड, लातूर संचालक हाफिज जावेद या सर्व मदरशामध्ये मुस्लीम समाजातिल शेकडो गोर-गरीब मुले व मुली निवासी उर्दु- अरबी धार्मिक शिक्षण घेतान, परंतु मागिल काही वर्षापासुन सदरील मदरशांमधील
संचालक व शिक्षक (मौलाना) हे लिंगपिसाटाप्रमाणे वागत आहेत, धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलीचे सर्रास लैंगिक शोषण करतात व मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करतात व मदरशातील मुले गरीब कुटुंबातील किंवा अनाथ असल्याने यांची कोठेही दाद फिर्याद होत नाही. तक्रार झाली तरीही पैशाच्या जोरावर हे सर्व प्रकरण मिटवून टाकतात प्रसंगी धाक. दाखवुन धार्मिक आस्था, राजकीय वरदहस्त व पैशांच्या जोरावर यांचे काळे कारनामें बिनदिखत वर्षानुवर्षे चालु आहेत,
मदरशांच्या माध्यमातून या संस्थाचालकांनी कोट्यावधी रूपये कमवुन बेहिशोबी मालमत्ता जमविली आहे. तरी आपणास विनंती करण्यात येते की, वरिल सर्व मदरशांची व त्यांच्या संचालकांची C.B.1. तर्फे सखोल चौकशी करावी यात प्रामुख्याने या सर्व मदरशांचे ऑडीट तपासावे. 2) मदरशातील मुलांमुलींचे लैंगिक शोषण झाले आहे का ? याची वैद्यकिय तपासणी करावी, मदरशांच्या संचालकांची चल-अचल संपत्ती गाड्या, बैंक बैलेंस व ईतर मालमत्ता तपासावी व ताब्यात घ्यावी. सदरील सर्व मदरसे हे औकाफ बोर्डाच्या ताब्यात घेऊन यावर शासकीय व अशासकिय संचालक मंडळ नेमावेत. 3) मौलाना इस्माईल अब्दुल करीम शेख (कास्मी) हे पाकिस्तान, बांग्लादेश, भुतान, नेपाळ, सौदी अरब या देशांचे दौरे करतात हे त्यांचे पासपोर्ट चेक केल्यास समजेल, यांना पैसाही याच देशातुन येतो व मौलाना ईस्माईल कास्मी यांना पाकिस्तानची खिलाफत पदवी भेटलेली आहे. याचीही चौकशी व्हावी. यांच्याकडे वक्फ बोर्ड, औरंगाबादची शहर काझी हि पदवी आहे. या पदवीने ते बोगस लग्न व बोगस तलाक करतात हि पदवी रद्द करावी.मौलाना इस्माईल अब्दुल करीम शेख (कास्मी) यांच्यावर मुलींवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असुन त्यांच्या अत्याचाराचे व्हीडीओ-ऑडिओ सोशल मिडियावर फिरत आहेत. दोघांचीही नार्को टेस्ट करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा, लातूर शहर जिल्हा शहर जिल्हा अध्यक्ष हाशमी एम.एस.यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे