Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राजीव गांधी चौकाजवळ कार अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार अन् दोघे गंभीर जखमी

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
राजीव गांधी चौकाजवळ कार अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार अन् दोघे गंभीर जखमी  
 ः शिवाजीनगर पोलीसात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल






लातूर दि.23-11-2023
शहरातील राजीव गांधी चौकाजवळील गुरू माऊली हॉस्पिटल समोर राजीव गांधी चौकाकडून महात्मा बसवेश्‍वर चौकाकडे जाणार्‍या दुचाकीस बसवेश्‍वर चौकाकडून विरोधी बाजुने येणार्‍या कार चालकाने आपले वाहन हायगायी व निष्काळजीपणाने चालवून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले असल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.
शहरातील राजीव गांधी चौक ते बसवेश्‍वर चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर गुरू माऊली हॉस्पिटल समोर एमएच 24 ए.क्यु.1915 या दुचाकीवर बसून एलआयसी कॉलणी येथील रूमकडे जाणार्‍या तिघांना गाडी क्र.एमएच 24 बी.एल.7666 या महिंद्रा एक्सयुव्ही 300 कारच्या चालकाने मद्यप्राशन करून आपल्या ताब्यातील वाहन हायगई व निष्काळजीपणे चालवून झालेल्या अपघातात हॉटेल मॅनेजर दीपक अंकुश कांबळे (वय 35) रा.चिंचोली जोगन ता.औसा जि.लातूर हा जागीच ठार झाला तर रवीराज नितीन पाटील (वय 22 वर्ष), निलेश कांबळे (वय 21 वर्ष) रा.एल.आय.सी. कॉलणी,लातूर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जवळील गुरू माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
याप्रकरणी शैलेंद्र मोहन कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात कलम 304 अ, 279, 337, 338, 184 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर विशाल शिंदे हे करीत आहेत. 
Previous Post Next Post