लातूर शहरातील वाहतूकीची समस्या सोडवण्यासाठी रेल्वे स्टेशन गेट ते स्व. विलासराव देशमुख मार्ग जोडण्याची मागणी
लातूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील सतत होत असलेली वाहतूक कोंडी वर कायमचा उपाय निघावा यासाठी जुने रेल्वे स्टेशन गेट ते स्व. विलासराव देशमुख मार्ग जोडण्यात यावा अशी मागणी भाजपचे प्रमोद गुडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लातूर शहराच्या मुख्य रस्त्यावरील होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जुने रेल्वे स्टेशन गेट ते स्व. विलासराव देशमुख मार्ग जोडण्यात यावा अशी मागणी भाजपचे प्रमोद गुडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.लातूर शहरातील वाहनांची वाढती संख्या, रस्ते अरुंद यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे, तासानतास वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. यामध्ये पूर्व भागातून शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वेची जागा हस्तातरण करून जुने रेल्वे स्टेशन गेट ते स्व. विलासराव देशमुख मार्ग जोडावा यामुळे छत्रपती शाहू महाराज चौक ते वसवाडी उड्डाणपुलापर्यंत एकेरी मार्ग सुरु होऊन वाहतुकीची कोंडी रोखण्यात मोठी मदत होणार असल्याचे निवेदन अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपा मंडल प्रमोद गुडे यांनी दिले आहे.