Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लाचलुपत प्रतिबंधक विभाग, लातूर तर्फे "दक्षता जनजागृती सप्ताह-२०२३" (Vigilance Awareness Week)

लाचलुपत प्रतिबंधक विभाग, लातूर तर्फे  "दक्षता जनजागृती सप्ताह-२०२३" (Vigilance Awareness Week)






दक्षता जनजागृती सप्ताह- २०२३ अनुषंगाने आज दिनांक ३०/१०/२०२३ रोजी सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मा. श्री. निकेतन कदम, (IPS), सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग चाकुर, जि. लातूर यांना बोलावण्यात आले होते. तसेच श्री. पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर व श्री. गणेश कदम, पोलीस निरीक्षक, वा.नि.शा, लातूर, भास्कर पुल्ली पोलीस निरीक्षक, लाप्रवि, लातूर, अन्वर मुजावर पोलीस निरीक्षक, लाप्रवि, लातूर व सर्व लाप्रवि, लातूर येथील अंमलदार हजर होते.

दक्षता जनजागृती सप्ताह- २०२३ अनुषंगाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथील कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन सत्यनिष्ठा बाबतची शपथ घेण्यात आली. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमीत्ताने मा. राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य आणि मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांचा संदेश सर्वांना वाचून दाखविला. भ्रष्टाचार विरोधी जनजागृती बाबत तयार करण्यात आलेले पोस्टर, बॅनर, स्टिकरचे विमोचन करण्यात आले. भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करिता तयार करण्यात आलेला भ्रष्टाचार विरोधी जनजागृती रथ व त्यावर पी.ए. सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार जनजागृतीची ऑडीओ क्लीप लावून मान्यवरांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवुन रथ लातूर जिल्हयात रवाना करण्यात आला.

सदर दक्षता जनजागृती सप्ताह-२०२३ मध्ये दिनांक ३०/१०/२०२३ रोजी ते दिनांक ०५/११/२०२३ या कालावधीदरम्यान लातूर जिल्हयातील सर्व तालुके व मोठे शहरे, गाव या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी जनजागृती रथ व त्यावर पी.ए.सिस्टीम मध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीची ऑडीओ क्लीप लावुन फिरविण्यात येणार आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक, स्टीकर, बॅनर सेल्फी स्टैंड लावण्यात येणार आहेत.

तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी / कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी

लाचेची मागणी करीत असल्यास तसेच भ्रष्टाचार संबंधाने काही माहीती असल्यास खालील कमांकावर संपर्क करावा.

. डॉ. राजकुमार शिंदे,

पोलीस अधीक्षक, ला.प्र. विभाग, नांदेड परिक्षेत्र
०९६२३९९९९४४
२) पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधिक्षक
ला. प्र. विभाग, लातूर 
०९३०९३४८१८४
३) टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक
२०६४
४) कार्यालयाचा फोन क्रमांक 
०२३८२-२४२६७४

मोबाईल क्रमांक 
Previous Post Next Post