Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.च्यावतीने नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीचा गौरव सोहळा थाटात

लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.च्यावतीने  
 नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणीचा गौरव सोहळा थाटात  




लातूर : लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने रविवारी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा गौरव सोहळा महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे,महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे सचिव अनिल नावंदर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 
              डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या गौरव सोहळ्यास संघटनेचे मराठवाडा विभागाचे उपाध्यक्ष अतुल कोटलवार , लातूर जिल्हा अध्यक्ष रामदास भोसले, लातूर तालुका अध्यक्ष ईश्वर बाहेती, सचिव नागेश स्वामी यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वप्रथम कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या अतुल अहिरे यांचा सत्कार लातूर जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष रामदास भोसले व तालुका संघटनेचे अध्यक्ष ईश्वर बाहेती यांनी केला. तर अनिल नावंदर यांचा सत्कार जिल्हा संघटनेचे सचिव अरुण सोमाणी व तालुका सचिव नागेश स्वामी यांनी केला. त्यानंतर सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अतुल अहिरे यांनी लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.च्या बिनविरोध निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्यात ज्या काही सक्षम केमिस्ट संघटना कार्यरत आहेत, त्यामध्ये लातूर जिल्हा अग्रेसर असल्याचे त्यांनी गौरवाने नमूद केले. केमिस्ट बांधव रुग्णांना जी सेवा उपलब्ध करून देतात, ती अतुलनीय अशी आहे. राज्यातील सर्व फार्मासिस्ट बांधवांनी फार्मसीच्या रिफ्रेशर कोर्सेसचा लाभ घेऊन आपले ज्ञान आणखी अद्यावत करावे. जेणेकरून रुग्णसेवा आणखी चांगल्या प्रकारे करता येईल असे त्यांनी सांगितले. राज्यातील फार्मसी महाविद्यालयांच्या अडचणींची सोडवणूक आपण फार्मसी कौन्सिलच्या माध्यमातून करू असेही त्यांनी सांगितले. तर अनिल नावंदर यांनी संघटनेच्या सर्व सभासदांनी व्यवसायात काळानुरूप आवश्यक ते बदल करून या क्षेत्रातील स्पर्धेला तेवढ्याच समर्थपणे स्पर्धेने उत्तर देऊन इतिहास घडवावा असे मत व्यक्त केले. 
    लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो.चे नवनिर्वाचित अध्यक्ष रामदास भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्ह्यातील केमिस्ट बांधवानी आपल्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा या पदावर कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल आपण सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो असे सांगितले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने लातूर जिल्ह्याचे कार्य राज्यात अव्वल राहील यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामदास भोसले यांसह संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीचा गौरव करण्यात आला. 
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर बाहेती यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. शेवटी सचिव नागेश स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद औरादे, रविंद्र दरक, मनोज आगाशे, राजकुमार राजारूपे, अरुण सोमाणी, उमाकांत पाटील, सतीश भुतडा, विजय बेल्लाळे, हेमंत मुळे , रुपेश कोटलवार , अनिल जवादवार यांसह लातूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. 
Previous Post Next Post