गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लोकसभेत घुसखोरी केल्याप्रकरणी महाराष्ट्रातील तिन जणांना अटक;त्यामध्ये लातूर मधील एकाचा समावेश
13 डिसेंबर : लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून सभागृहात गोंधळ घालणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आल्याने धक्कादायक माहिती समोर आलीअसून तिघांमध्ये दोन तरुण आणि एक महिला आहे. यात महाराष्ट्रातील अमोल शिंदे नावाच्या तरुणाचाही समावेश आहे. अमोल शिंदे लातूरचा असल्याची माहिती समोर येतेय. म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावे पास तयार केले होते अशी माहितीही समजते. संसद परिसरात अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अमोल धनराज शिंदे असं आहे. २५ वर्षीय तरुण लातूरचा आहे. तानाशाही नही चलेंगी अशा घोषणाही त्यांनी दिल्या.