बिग बॉस फेम तृप्तीताई देसाईं यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर मध्ये मातोश्री वृध्दाश्रम येथे वुलन ब्लैंकेट चे वाटप
तृप्ती देसाई यांचा वाढदिवस लातूरच्या मातोश्री वृद्धाश्रमात साजरा....
भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तथा धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा वाढदिवस माझं लातूर परिवाराच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमातील ६० आई-बाबांना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट देऊन उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या हटके आणि परिणामकारक सामाजिक आंदोलनामुळे देशभरात नावलौकिक असलेल्या तृप्ती देसाई या माझं लातूर परिवाराच्या हितचिंतक आहेत. माझं लातूरचा संविधान उद्देशीका उपक्रमास त्यांनी राज्यभर चालना देण्यासाठी प्रयत्न केले. काल त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री वृद्धाश्रमातील आई बाबांना ब्लँकेट वितरित करून साजरा करण्यात आला. या प्रसंगी माझं लातूर परिवाराचे शांताराम साठे, सतीश तांदळे, विष्णु आष्टीकर, डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, झाकीर सय्यद यांच्यासह वृद्धाश्रमातील कर्मचारी उपस्थित होते.