Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विलासरावजी देशमुख पार्क मधील "वंडर वर्ल्ड" प्रकरणाचा वाद चिघळला;प्रकरण कोर्टात असताना महानगरपालिकेनी केली कार्यवाही

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
विलासरावजी देशमुख पार्क मधील "वंडर वर्ल्ड" प्रकरणाचा वाद चिघळला;प्रकरण कोर्टात असताना महानगरपालिकेनी केली कार्यवाही 


लातूर-विलासरावजी देशमुख पार्क मधील "वंडर वर्ल्ड" प्रकरणाचा वाद विकोपाला गेला असून प्रकरण कोर्टात असताना महानगरपालिकेनी अनधिकृत कार्यवाही केल्याची माहिती उद्योजक सोनाली उमेश ब्रिजवासी यांनीपत्रकाद्वारे प्रसिद्धि माध्यमांना दिली आहे.

त्यानी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,मी आज माझी व्यथा आपल्या माध्यमातून समाजासमोर आणू इच्छिते, मी सोनाली उमेश ब्रिजवासी एक स्टार्टअप महिला उद्योजक आहे. मी सरकारच्या स्टार्टअप योजनेला प्ररित होवून लातूर मधील लोकनेते विलासरावजी देशमुख पार्क मधील जागा ई टेंडरने महानगर पालिकेकडून ९ वर्षा करिता करार करून वंडर वर्ल्ड या नावाने व्यवसाय करीत आहे. काल जो प्रकार महानगर पालिकेच्या विभागाने कसलेही आदेश नसतांना अकस्मीतरित्या कोणाचे घर पडावे तसे माझे व्यवयास उध्दवस्त करण्याच्या उद्देशाने माझे व्यवसाय मोडाण्याचे काम महानगर पालिकेकडून करण्यासाठी आले होते. एक महिला उद्योजक स्वतःचे व्यवसाय वाचविण्यासाठी त्यांच्या जे.सी.बी. समोर व त्यांच्या कर्मचाऱ्यासमोर खंभीर उभी होती. पण महानगर पालिकेचे कर्मचारी आदेश नसतांना ही थांबत नव्हते. सदरील प्रकरण न्यायालयात न्याय प्रविष्ठ असून सुध्दा नगर पालिका अवैद्यरित्या सदरील महिलेच्या व्यवसायात दार तोडून तेथील कॅमेरे डी.व्ही. आर. तसेच त्यांच्या तिकीट कॅश काऊंटरमधील सामान उचलून नेले याची परवानगी त्यांना नसतानाही महानगर पालिकेने हा गैरव्यवहार केला. कोर्टाने यावर तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. यामुळे याचा संबंधि विभाग कार्यवाही न करता परतला.

व्यवसायासाठी मी माझे घर विकून पैसे उभे केले तसेच जवळपास दीड कोटी रू. बँकेकडून कर्ज घेतले त्याचे हाप्ते मी फेडत आहे. ठराविक लोक सातत्याने त्रास देऊन पैशे उकळण्याच्या उद्देशाने खोटया बातम्या, तक्रारी देऊन लोकात व महानगर पालिकेत गैरसमज पसरून दबाव आनण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्या संबंधीत ठराविक लोकांवर पोलीस तक्रार केली आहे. त्यातील काही लोंकावर गुन्हे ही दाखल झाले आहेत. मी नगर पालिके विरोधात सुध्दा कोर्टात गेली आहे. मी सर्व पुढाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्यासाठी विनंती केली. कांहीना प्रत्यक्ष भेटले परंतू हे थांबले नाही. मी त्रास व संघर्ष करून इतपर्यंत पोहचले आहे. माझ्या या व्यवसायावर माझ्याकडे काम करणार कामगार त्यांचे कुटूंब तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या या व्यवसायावर
कित्येक कुटुंब अवलंबून आहेत. यात विधवा बायका, निधारा बायका, अपंग मुले, शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी अश्या कित्तेक जणांचे रोजगार, घर व उत्पन्न अवलंबून आहे.

महानगर पालिकेने काही कारण नसतांना करार रद्द केला तर माझे दीड कोटी पेक्षा जास्त नुकसान होणार आहे. मी बँकेचे कर्ज फेडू शकणार नाही. यावर अवलंबुन असलेले सर्व कामगार व कुटूंब बेरोजगार होतील. या व्यवसायामुळे लातूर करांना भेटणाऱ्या सुविधा बंद होतील. या सर्व प्रकारामुळे मी व माझे परिवार खुप तनावात आहे. खुपदा मनात आत्महत्येचे विचार आले यांच्या खंडणी व नाहक होणाऱ्या त्रासामुळे मी आत्ता थकले आहे. आज एक स्त्री म्हणून स्वतःच्या पायावर स्वालंबी बणून उभी राहू शकत नाही का? मी खूप सहन केले एकच प्रश्न मनात येतो नगर पालिका ९ वर्षाचा करून या व्यवसासायत माझी ऐवढी मोठी गुंतवणूक आहे. कसलाही आदेश व ठोस कारण नसताना माझ्या संसाररूपी व्यवसाय मोडाचे प्रयत्न महानगर पालिकेकडून होत आहे. संबंधीत विभागाला खरेच अतिक्रमण म्हणून माझ्या व्यवसायातील फक्त दार तोडून कॅमेरा डी.व्ही. आर. घेवून जाण्याचे अधिकार होते का ? आणि तोडण्याचे आदेश मागितल्यावर आमच्याकडील न्यायालयीन प्रकरण न्याय प्रविष्ठ असल्यामुळे तेथून पळ काढला आणि परत अफवा पसरून महिला अंगावर सोडल्या अश्या खोट्या बातम्या पसरविल्या खरे पाहता हा व्यवसाय एका महिला उद्योगजिकेचा आहे व तीने ४० ते ५० महिलांना रोजगार दिला आहे. मग काही चुकीचे घडत असताना महिला ठाम उभी राहणार नाही का ?
माझ्यावर जाणुन-बुजून होणाऱ्या अत्याचारासाठी समस्त लातूरकर व मिडीयाला माझी ऐवढीच विनंती करू इच्छिते की, मी कुठल्याही कराराच्या अटीचा भंग केलेला नाही. त्रास देऊन पैसे उकळण्याच्या उद्देशाने काही लोक व महागनर पालिका असे कृत्य करत आहे. आपण माझी हि माहिती आपल्या मिडीयामधून विभागीय आयुक्त, सर्व नेते मंडळी, आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाला पर्यंत हा विषय घेऊन मला न्याय मिळवून द्यावा.
आपल्या व सामान्य जनतेच्या दरबारात एक महिलेला न्याय मिळावा म्हणून परमेश्वर रूपी जनतेच्या रूपात आपण मला मदत कराल हिच अपेक्षा. धन्यवाद !
Previous Post Next Post