Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

"विठ्ठला"चे पाय लागले उदगीरला ; अहमदपूर ला केंव्हा लागणार! उदगिर मध्ये सव्वापाच लाखांचा गुटखा जप्त

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
"विठ्ठला"चे पाय लागले उदगीरला ; अहमदपूर ला केंव्हा लागणार!
उदगिर मध्ये सव्वापाच लाखांचा गुटखा जप्त



"महाराष्ट्र राज्यात सुगंधित पान मसाला, गुटखा विक्रीसाठी बंदी असली तरी सर्रास गुटखा विक्री होत आहे.यावर अन्न औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.अन्न औषध प्रशासनातील काही अधिकारी मात्र भ्रष्टाचाराने बरबटलेले असून नाईलाजास्तव कार्यवाही साठी जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे.आशा या नाईलाजास्तव का होईना "विठ्ठला"चे पाय लागले उदगीरला ; अहमदपूर ला केंव्हा लागणार! असे सर्वसामान्य नागरिकांना वाटू लागले आहे."
 उदगीर : १५ कि. मी. अंतरावर बॉर्डर असलेल्या शेजारच्या कर्नाटक राज्यातून उदगीर शहरात दररोज मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची आवक होत असते यावर उदगीर पोलिसांनी गुरुवारी (दि. १४) दुपारी शहरातील मदिनानगर आयशा कॉलनीत उभ्या असलेल्या दोन वाहनातून पाच लाख २७ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि दहा लाख रुपये किंमतीचे दोन्ही वाहने असा एकूण १५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या प्रकरणी शुक्रवारी दुपारी चार वाजता उदगीर शहर पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उदगीर शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि. १४) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस कर्मचारी पवार, साठे, नागरगोजे, कच्छवे यांच्या पथकाने शहरातील मदिनानगर मधील आयशा कॉलनी येथे अचानक छापा मारला. त्या ठिकाणी अशोक लेलँड दोस्त टेम्पो क्रमांक एम. एच. ४७ वाय ६३१६ आणि ईरटीगा कार क्रमांक एम. एच. २४ ए. एफ. ५२४३ या दोन्ही वाहनांची

पोलिसांनी झडती घेऊन तपासणी केली. तेंव्हा दोन्ही वाहनांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा नजर ९००० चे ३३६० पुडे, गीतांजली ५००० चे ५० पुडे आणि सागर चे १०० पुडे असा एकूण पाच लाख २७ हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ मिळून आला. तर मिळून आलेल्या प्रतिबंधित गुटख्यासह दहा लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने असा एकूण १५ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उदगीर शहर पोलिसांनी सदर कारवाईची माहिती लातूर येथील सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागास कळवली होती. शुक्रवारी अन्नसुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांनी उदगीर येथे येऊन याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी अजहर पटेल, हमीद पटेल आणि जफर पटेल (सर्व रा. मदिनानगर आयशा कॉलनी उदगीर) यांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ (गुटखा) जवळ बाळगून अन्नसुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध गु. र. नं. ३४६ / २०२३ कलम १८८, २७२, २७३, ३२८, ३४ भा. दं. वी. आणि सहकलम अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Post Next Post