गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
"झिंगाट" च्या गाण्यावर रोडवर उसाच्या ट्रॅक्टर चा"धांगडधिंगा
लातूर -लातूर जिल्ह्यात सध्या शेकडोच्या संखेने उसाच्या गाड्या कारखान्यावर जात आहेत त्यामध्ये ट्रॅक्टर हे
2 - 2 ट्राॅली लावुन व कायदा पायदळी तुडवत ओव्हर लोड ऊसाची वाहतूक करत आहेत त्यामुळे ट्रॅक्टर ड्राइवर सह समोरुन येणार वाहनांमधील प्रवाशांचे जीव धोक्यात घालत आहेत विशेष म्हणजे
ट्रॅक्टर मध्ये 2-2 साऊॅंड लावून मोठ्या आवाज आने "झिंगाट" सह इतर गाणे लावले जाते त्सायामुळे आजुबाजुने जाणार्या गाड्यांना त्रास तर होतोच परंतू ओहरटेक करताणा त्या ड्राइवर ला हाॅर्न चा आवाज ऐकू येत नाही त्यामुळे एक्सिडेंट होण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच प्रकार हाळी परिसरात वाढला असून संबंधीत खात्या- मधील सं.अधिका-यांना दिसत कसे नाही?या मागचे गोडबंगाल काय,का सर्व संबंधित अधिका-यांनी या अशा ट्रॅक्टर्सला " लिखीत वा अलिखीत " ! असा परवाना दिलाय का?या सारखे प्रश्न उपस्थित होतात.तसेच "झिंगाट" सारख्या गितांच्या "धांगडधिंगान्यावर' ऊसाची नियमबाह्य वाहतुक करणारे ट्रॅक्टर्सवर कोण व कधी कारवाई करणार ? एखादा मोठा अपघात होऊन कांहीजणांचे जीव/प्राण जावे आणि मगच आपण कारवाई करावी. अशी संबंधित अधिका-यांची ईच्छा आहे.का ? अशी कुजबूज हाळीसह परिसरातुन ऐकू येते.कारण उठसुठ अनेक ठिकाणी ओव्हरलोड व एखादे कागद नसल्य कारणावरुन अन्य वाहणांवर कारवाई करणारे सर्व सं.अधिकारी महोदय गाण्या धुंदी मधे ऊसाच्या ट्रॅक्टर्सवर माञ या मार्गावर अद्यापही कारवाई केली नाही हे मात्र विशेष
तेंव्हा अशा ट्रॅक्टरचा अपघात होऊन अनेकांचे बळी जायची वाट न पाहता नियमानुसार अशा ट्रॅक्टर्सवर कारवाई करावी.अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होताना दिसत आहे..