भारतीय जनता पक्षाचे लातूर शहर उपाध्यक्ष तथा बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष श्री सुरेश राठोड यांनी सराटी येथे जावून मराठा आरक्षणास दिला जाहीर पाठिंबा
मराठा समाज हा महाराष्ट्रातील मुख्य घटक आहे. मराठा समाजाचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. मराठा समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती असून 99 टक्के मराठा समाज अल्पभूधारक आहे. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या प्रचंड मोठी आहे. मराठा समाजाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तसेच आरक्षण नसल्यामुळे गरीब मराठा कुटुंबातील मुले शैक्षणिक व नोकरीच्या सुविधांपासून वंचित आहेत. याचा परिणाम मराठा कुटुंबातील आत्महत्यांचे प्रमाण मागील काही काळात वाढले आहे. मराठा समाजाची आजची परिस्थिती लक्षात घेता या समाजाला आरक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मी लोकप्रतिनिधी या नात्याने मराठा क्रांती मोर्चाचा सर्व मागण्यांन पाठींबा देतो व मराठा समाजास त्वरित आरक्षण द्यावे अशी मागणी करतो.