लातूर शहर व ग्रामीण भाजपा लातूर यांच्या वतीने राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो व पुतळा दहन आंदोलन
लातूर-प्रतिनिधि
लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे भारताचे सन्माननीय उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती मा. जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन करीत होते राहुल गांधी हे त्यांचे चित्रिकरन करीत होते, या प्रकाराने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली.त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार छत्रपति शिवाजी महाराज चौकामध्ये हजारोंच्या संखेने भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळून शहर जिल्हाध्यक्ष देविदासजी काळे व ग्रामीण अध्यक्ष दिलीपराव (मालक) देशमुख यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो व पुतळा दहन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप प्रदेश सदस्य रवि सुडे, विवेक बाजपाई, सुधीर धूतेकर निवडणूक प्रमूख गुरुनाथ मगे, सरचिटणीस प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी, मीनाताई भोसले, दिग्विजय काधवठे, महिला मोर्चा अध्यक्ष रागिनीताई यादव, युवामोर्चा अध्यक्ष ॳॅड. गणेश गोमचाळे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष निखिल गायकवाड, मंडल अध्यक्ष प्रमोद गुडे, ॳॅड. ललित तोष्णीवाल, संजय गीर, गोपाळ वांगे, सौ शोभाताई पाटील, शहर उपाध्यक्ष ॳॅड प्रदीप मोरे, प्रवीण कस्तुरे, गणेश हेड्डा, किसन बडगिरे, निर्मला कांबळे, रत्नमाला घोडके, शोभा कोंडेकर, आफ्रिन शेख, प्रगती डोळसे, ज्योती मार्कडेय, गोरोबा गाडेकर, आनंद कोरे, विशाल हवा पाटिल, ज्योतिराम चिवडे, शिवा सिसोदीया, अरूण जाधव, भारत लोंढे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व युवा हजारों च्या संख्येने उपस्थित होते.