Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरकर सावधान..आता पेंटही होतोय डुप्लीकेट! एसिएन पेंट कंपनीचे लेबल वापरून बनावट पेंट विकणाऱ्या वर धाड; दोघांवर गुन्हा

888
गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरकर सावधान..आता पेंटही होतोय डुप्लीकेट!
एसिएन पेंट कंपनीचे लेबल वापरून बनावट पेंट विकणाऱ्या वर धाड; दोघांवर गुन्हा 

प्रतिनिधी । लातूर


स्वतःच्या कंपनीत बनावट माल तयार करुन त्यावर नोंदणीकृत कंपनीचे कंपनीचे लेबल लावून पेंट विक्री करणाऱ्यास अतिरिक्त एमआयडीसीतील कारखान्यावर पोलिसानी धाड टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आलीअसून संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे अधिकारी व एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने धाड टाकून साडेतीन लाखांचा माल जप्त केला. 
विक्री करावयाचा कोणताही ईष्ट प्रतीचा माल (त्यात इतर पदार्थ मिसळून वा अन्य प्रकारे) अनिष्ट प्रतीचा करून तो इष्ट प्रतीचाच असल्याचे भासविणे, यास भेसळ करणे असे म्हणतात. विक्री करावयाच्या पदार्थात भेसळ करून अधिक नफा मिळविण्याची प्रथा फार पुरातन काळापासून आहे. शासनाकडून भेसळ-प्रतिबंधक उपाय योजले जात असूनही ही प्रथा आजतागायात चालूच आहे. ज्ञानाच्या विस्ताराबरोबर आणि विक्रीच्या पदार्थांच्या सतत वाढणाऱ्या विविध प्रकारांबरोबर भेसळीचे प्रकारही विस्तारले आहेत. खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यप्रसाधने, कापड, बी-बियाणे, खते, रसायने, बांधकाम सामग्री इ. बाजारातील बहुतेक सर्व पदार्थांत कोणत्या ना कोणत्या रूपातील भेसळ असण्याची शक्यता असते. काही वेळा अशी भेसळ हानिकारकही ठरण्याची शक्यता असते. भेसळ करण्यामागे अधिकात अधिक नफा मिळविणे हाच प्रमुख उद्देश असतो. भेसळीच्या प्रकरणात मालाचे उत्पादक व विक्रेते हे दोघेही अनेकदा सहभागी असतात. मालाची नैसर्गिक वा कृत्रिम टंचाई व महर्गता या गोष्टी भेसळ करण्याच्या प्रवृत्तीस अधिक चालना देतात . पैसे कमावण्यासाठी हे लोक वाटेल ते मार्ग वापरतात .असेच पैशे कमविण्याच्या उद्देशाने
अतिरिक्त एमआयडीसीतील प्लॉट क्र ए-१९, हरंगुळ (बु) परिसरात अभिषेक आर. करजगे याच्या मालकिची एक कंपनीत तेथील पेंटच्या बनावट मालावर नोंदणीकृत कंपनीचे लेबल लावून विक्री होत असल्याची माहिती खाजगी गुप्तहेराकडून संबंधित कंपनीस मिळाली होती. त्यानुसार कंपनीच्या वतीने महेश अर्जुन मुखिया व त्यांचे अन्य एक सहकारी विनित लक्ष्मण भोसले लातुरात आले. त्यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक सोबत घेऊन कंपनीवर धाड टाकली. घटनास्थळावरून ३ लाख ३२ हजार १८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मुखिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तपास अधीकारी आर. ए. लोखंडे म्हणाले, या कंपनीचा मालक अभिषेक कराजगे फरार आहे. दुसरा संशयित यशवंत बलभीम ससाने हा कर्मचारी असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
Previous Post Next Post