गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
कासारगाव शेत शिवारात अनोळखी पुरुष जातीचे प्रेत; पोलिसांना केले संपर्क साधण्याचे आवाहन
याबाबत माहिती अशी की दिनांक 23/12/2023 रोजी सकाळी दहा वाजता कासारगाव शिवारातील एका शेतामध्ये एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत मिळून आले असून पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास करण्यात येत आहे. सदर मयत इसमाची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही.
मयताचे अंदाजे वय 30 ते 32 वर्ष असून वर्ण सावळा, उंची अंदाजे 5 फूट, अंगात पिवळसर रंगाचा जॅकेट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट असून उजव्या हाताच्या पंजावर आई व करंगळीवर "ओम" असे गोंदलेले तर उजव्या हाताचे मनगट पासून कोपर्यापर्यंत "श्री गुरुदेव" असे नाव गोंदलेले आहे.
तरी वरील नमूद अनोळखी इसमा बाबत कोणाकडे माहिती उपलब्ध असल्यास पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे फोन क्रमांक 02382_246211 ,
तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव _ मो.क्र. 8275706326 वर संपर्क साधण्याचे आवाहन लातूर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे.