भाजयुमोच्या प्रदेश सचिवपदी ऋषिकेश कराड यांची नियुक्ती
लातूर दि.२७ :- भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव पदी लातूर ग्रामीण मधील भाजपाचे युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांची भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे. या निवडीबद्दल ऋषिकेश कराड यांचे लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघासह जिल्हाभरातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या काही दिवसापासून भाजपाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेऊन कार्यरत असणारे भाजपाचे युवा नेते ऋषिकेश कराड यांचा मोठा जनसंपर्क आहे. संघटन कौशल्य, कर्तुत्व आणि वकृत्व असल्याने सामाजिक, राजकीय व इतर कार्यातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
आजपर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदाची जबाबदारी २६ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी एका पत्रकांन्वये दिली आहे. देशाची पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय नेते तथा उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपली भाजयुमो प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून भाजपाला ताकद मिळून देण्यासह पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा भाजपाचे काम तळागाळातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कराल अशी अपेक्षा नियुक्ती पत्रातून राहुल लोणीकर यांनी व्यक्त केली आहे.
भाजयुमोच्या माध्यमातून प्रदेश स्तरावर काम करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल ऋषिकेश कराड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, पालकमंत्री गिरीषजी महाजन, माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्ह्याचे खासदार सुधाकर शृंगारे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड, आ. अभिमन्यू पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांचे ऋषिकेश कराड यांनी आभार व्यक्त केले आहेत.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल ऋषिकेश कराड यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.