Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार आरक्षण मिळवणार नसू तर पुढची पिढी माफ करणार नाही - देविदास काळे

एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाचा एल्गार आरक्षण मिळवणार नसू तर पुढची पिढी माफ करणार नाही
  - देविदास काळे



   औसा/प्रतिनिधी: पूर्वीपासून भटकंती करणारा धनगर समाज आरक्षणास पात्र आहे.या समाजास आरक्षणाची अत्यंत गरज असून ते मिळविण्यासाठी आपण आंदोलने करीत आहोत. आरक्षणासाठी काहीही न करता स्वस्थ बसलो तर पुढची पिढी आपणास माफ करणार नाही,असे प्रतिपादन भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी केले.
    धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी औसा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चास मार्गदर्शन करताना काळे बोलत होते.या मोर्चात भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके,घनश्याम बापू हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना देविदास काळे म्हणाले की,धनगर व धनगड हे एकच आहेत हे आता सर्वांनाच कळून चुकले आहे.त्यामुळे आता आरक्षण मिळण्यास वेळ लागणार नाही.असे असले तरी आपल्याला आरक्षण मिळवण्यासाठी नियोजन करून आंदोलने करावी लागतील.समाजाला एकत्रित करावे लागेल. एकीचे बळ असेल तर आरक्षण लवकरच पदरात पडेल.आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांनाही आता आपले महत्त्व कळून चुकले आहे.धनगर समाज आरक्षणासाठी पात्र आहे हे देखील त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे धनगर समाजास तात्काळ आरक्षण द्यावे,
अशी मागणी त्यांनी केली. समाजातील नेत्यांनी आपले राजकीय अधिनिवेश बाजूला सारून या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहनही त्यांनी केले.
    नितीन बंडगर पाटील, ओम बंडगर पाटील,राजेश सलगर,आबासाहेब कांबळे,रामभाऊ कांबळे, आकाश कांबळे,हनुमंत कांबळे,ऋषी कांबळे, मनोज तिगाडे,महादेव कांबळे या युवकांच्या पुढाकारातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.औसा व परिसरातील हजारो समाज बांधवांनी या मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवला.
Previous Post Next Post