Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपीस शिक्षा

धनादेश न वटल्या प्रकरणी आरोपीस शिक्षा

लातूर येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी 3 रे न्यायालय, लातूर यांनी आरोपी नामे बसलिंग सोमनाथ बुलबुले यांना 2 महिने सक्षम कारावास व धनादेशाच्या दुप्पट रकमेसह नुकसान भरपाई देण्याची शिक्षा दिली आहे.

मौ. वागदरी, ता. अक्कलकोट, जि. सोलापुर येथील फिर्यादी नामे भालचंद्र सोमनप्पा नन्ना यांनी आरोपी नामे बसलिंग सोमनाथ बुलबुले यांचे विरुध्द अक्कलकोट न्यायालयामध्ये कलम 138 नि.ई. अॅक्ट प्रमाणे प्रकरण दाखल केले होते व सदरचे प्रकरण हे रक्कम रु.1,40,000/- मध्ये तडजोडीने मिटले होते व सदर रक्कमेपैकी आरोपीने फिर्यादीस नगदी रोख रक्कम रु.70,000/- देवुन उर्वरीत रकमेकरीता आरोपीने रु.35,000/- दोन चेक त्यापैकी एक त्यांचे भावाचे खात्याचा जो वटला गेला व एक आरोपीने स्वतःचे खात्याचा दिलेला धनादेश अनादरीत झाला त्यामुळे फिर्यादीने सदरचे प्रकरण आरोपी विरुध्द दाखल केले होते. सदर प्रकरणामध्ये फिर्यादीचा पुरावा व त्यांचे वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी 3 रे, लातूर, न्यायाधीश श्रीमती आरती शिंदे यांनी आरोपी बसलिंग सोमनाथ बुलबुले यांना दोन महिने सश्रम कारावास व रु.70,000/- नुकसान भरपाईचा आदेश केला आहे. तसेच सदर नुकसान भरपाईची रक्कम नाही दिल्यास आणखी एक महिण्याचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

फिर्यादीचे वतीने अॅड. युवराज य. इंगोले यांनी बाजू मांडली व यांना सदर कामात अॅड. एस.व्ही. जगताप, अॅड. एम.एन. भंडे व सोमनाथ गायकवाड यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post