Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वीरशैव लिंगायतांचा आरक्षणासाठी लातूरात महामोर्चा धर्मगुरू व राजकीय नेत्यांची हजेरी

वीरशैव लिंगायतांचा आरक्षणासाठी लातूरात महामोर्चा
धर्मगुरू व राजकीय नेत्यांची हजेरी




लातूर ः लिंगायत महासंघ लातूरच्यावतीने वीरशैव लिंगायत समाजाचा लिंगायत, हिंदु लिंगायताच्या आरक्षणासाठी आज महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात लिंगायत महासंघाचे अनेक शिवाचार्य व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला मंडळासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.
गुरूवार दि.21 डिसेंबर 2023 रोजी गंजगोलाई येथील महात्मा बसवेश्‍वर मंदिरात शैलेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते नारळ फोडून या महामोर्चाला सुरूवात झाली. हा महामोर्चा वीरशैव लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आला. त्यात लिंगायत, हिंदु लिंगायत या नावाला वाणी नावाला असलेले आरक्षण लागू होण्यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे तसेच मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्‍वर स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे. तसेच महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळाची रचना करून 2 हजार कोटींचा निधी द्यावा. तसेच निलंगा तालुक्यातील देवीहल्लाळी या गावात महात्मा बसवेश्‍वरांचे भाच्चे चन्नबसवेश्‍वर यांचे वास्तव्य होते म्हणून या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. व लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका पातळीवर वस्तीगृह सुरू करावे आदि मागण्या घेवून हा महामोर्चा शि.भ.प.शिवराज नावंदे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चा त्याठिकाणी गेल्यानंतर तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या महामोर्चात प्रा.सुदर्शनराव बिरादार, शैलेश पाटील चाकूरकर, शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर, बालानंद महाराज चापोली या धर्मगुरूंसह गुरूनाथ मग्गे, अविनाश रेशमे, शिवाजी रेशमे, माजी सभापती लक्ष्मीकांत मंठाळे, लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, किर्तनकार मंडळी, राजशेखर लाळीकर, बालाजी पाटील येरोळकर, कैलास जांबकर, संगमेश्‍वर बिरादार, सोमेश्‍वर स्वामी, राजाभाऊ वाघमारे, मन्मथ पाटील, रामलिंग बुलबुले, विश्‍वनाथप्पा मिटकरी, तानाजी पाटील भडीकर, संजय लिंबाळे, अ‍ॅड.अजय वागळे, संयोजन समितीचे अध्यक्ष नागनाथप्पा भुरके, प्रा.वैजनाथ मलशेट्टे, प्रा.विठ्ठल आवाळे, बसवराज ब्याळे, भिमाशंकर शेळके, बलराज खंडोमलके, सुनिल होनराव, विरेंद्र केवळराम, माजी नगरसेवक सुभाषप्पा सुलगूडले, सौ.छाया चिंदे, कल्पना बावगे, संगीता भुसनूरे, संगीता मलंग, वैशाली व्होनाळे, प्रिती सोनाळे, बालाजी पिंपळे, शिवराज शेटकार, प्रा.संगमेश्‍वर पानगावे, शरणप्पा अंबुलगे, सुभाष शंकरे, विश्‍वनाथ निगुडगे, शंकरराव पाटील गुंजोटीकर यांच्यासह हजारो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. हे निवेदन निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांना देण्यात आले.
Previous Post Next Post