भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा लातुर शहरजिल्हा कार्यकारीणी जाहिर
लातूर :- भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश अध्यक्ष ईद्रिस मुल्तानी, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ.अभिमन्यु पवार, आ. रमेशअप्पा कराड यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा लातुर शहर जिल्हा कार्यकारीणी अल्पसंख्यांक मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मोहसिनभाई शेख यांनी जाहिर केली.
अल्पसंख्यांक मोर्चा लातुर शहर जिल्हा कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष किशोर प्रेमचंद जैन, पठाण रियाजखाँन रशिदखाँन, सय्यद वाजीद, सय्यद युसुफ, तायप्पा कांबळे, सरचिटणिस पठाण अमजदखाँन राजाखाँन, शेख जमिर जिलानी, चिटणीस शेख नय्युम, शेख सालार , कुरैशी अजगर, मुस्तफा(रफीक) शेख, कोषाध्यक्ष अरबाजखाँ पठाण, सदस्य शेख सद्दाम, शेख शमशोद्दिन, शेख जावेद, सय्यद मोहसिन, शेख सलीम, शेख जावेद, शेख ईम्तीयाज,पटेल एजाज, अल्पसंख्यांक युवा अध्यक्ष शेख महंमद गफुर मिस्त्री, ओबीसी आघाडी अध्यक्ष हाजी खय्युम तांबोळी, दिव्यांग मोर्चा आघाडी अध्यक्ष कासिम पठाण, टुव्हिलर मँकेनिक आघाडी अध्यक्ष सय्यद निसार, परिवहन ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष शेख सलीम मैनोद्दिन, शिक्षक आघाडी अध्यक्ष पठाण वाजीद,
सोशल मिडीया प्रमुख वसिम पटेल यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकपर भाषणात बोलताना जिल्हाध्यक्ष मोहसिनभाई शेख यावेळी म्हणाले की शहरातील अल्पसंख्यांक समाज हा परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तसेच भाजपासोबत समाजाला जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लातुर शहराध्यक्ष देवीदास भाऊ काळे, प्रमुख पाहुणे शहर जिल्हा सरचिटणिस शिरिष कुलकर्णी, प्रविण सावंत, अँड दिग्विजय काथवटे, सचिव मुन्नाभाई हाशमी , आरेफभाई सिद्दिकी, हाजी जमिल मिस्त्री, हाजी जफर पटेल उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात देवीदास भाऊ काळे यांनी अल्पसंख्यांक समाजाच्या अडीअडचणी सोडवुन समाजाला मुख्य प्रवाहात आणायला भाजपा कटीबद्ध असुन सदैव अल्पसंख्यांक समाजासोबत आहे असे मत व्यक्त केले. तसेच अल्पसंख्यांक मोर्चा लातुर शहरजिल्हा कार्यकारीणीवर निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.सरचिटणिस शिरिष कुलकर्णी यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. यावेळी विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन हाजी जमिल मिस्त्री,आरिफ सिद्दिकी, मुन्तेजबोद्दिन हाशमी,जफर सालार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.