Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दुरावलेल्या सर्वच सहकाऱ्यांना भाजपाच्या प्रवाहात घेऊन मोदीजींचे मताधिक्य वाढवू का आ. रमेशआप्पा कराड यांचे प्रतिपादन

दुरावलेल्या सर्वच सहकाऱ्यांना भाजपाच्या प्रवाहात घेऊन मोदीजींचे मताधिक्य वाढवू
का आ. रमेशआप्पा कराड यांचे प्रतिपादन




       लातूर दि.२६- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचाराचा रेणापूर तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला असून त्यांच्या सोबत अनेकांनी काम केले आहे. मधल्या काळात काही कारणाने काही जण दुरावले असतील अशा सर्व सहकाऱ्याना पुन्हा भाजपाच्या प्रवाहात घेऊन काम करू, विकास पुरुष देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचे मताधिक्य वाढवू असे प्रतिपादन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

       लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचा लातूर जिल्हा भाजपाच्या चिटणीसपदी गंगासिंह कदम यांची नियुक्ती केल्याबद्दल पोहरेगाव येथील भाजपाच्या वतीने बूथ प्रमुख संजय चव्हाण, लालासाहेब मोरे, काकासाहेब शिंदे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष वाघ, किशन बेगळे यांच्या हस्ते सत्कार करून आभार व्यक्त केले. त्याचबरोबर ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी २० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वंजारवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रेणापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख नर्सिंग येलगटे, सह प्रमुख प्रशांत रायनूळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, तालुकाध्यक्ष अँड दशरथ सरवदे, संगायो समिती अध्यक्ष वसंत करमुडे, लातूर शहराध्यक्ष शिवसिंह सिसोदिया, गंगासिंह कदम, ज्ञानोबा भिसे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अमर चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

        लातूर ग्रामीण मतदार संघात गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेसचा आमदार आहे. या आमदारांनी कोणता विकास केला काय कामे केली हे एकदा जनतेला जाहीर सांगावे. काँग्रेसवाल्यांनी स्वतःचे आणि आपल्या बगल बच्‍चाचे हित साधले असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की भावनेचे आणि उसाचे राजकारण करून आजपर्यंत आमदारकी मिळवली जनतेला वेटीस धरण्याचा प्रयत्न केला असा प्रकार यापुढे चालू देणार नाही.

        देशात नरेंद्रजी मोदी आणि राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक सार्वजनिक विकासा बरोबरच वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू केल्या त्याचा लाभ कोट्यावधी जनतेला मिळाला असल्याचे सांगून आ. रमेशआप्पा कराड यावेळी बोलताना म्हणाले की स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी दिले नाही, मात्र मोदीजींनी जल जीवन योजनेमार्फत हर घर नल नल से जल योजना देशभर प्रभावीपणे राबवली. शासनाकडून मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान लाभार्थ्यांना थेट खात्यात जमा केले. मोफत धान्य वाटप सुरू ठेवले केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या कामाची माहिती सर्वांनी जनतेपर्यंत पोहोचावे असे आवाहन केले.

          येणारे वर्ष निवडणुकीचे असून केंद्रात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना फिर एक बार मोदी सरकार या भूमिकेतून समर्थन देण्याचा निर्धार जनतेने केला आहे. लातूर ग्रामीण मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत नरेंद्रजी मोदी यांना पर्यायाने भाजपा उमेदवारांना किमान ५० हजार मताचे मताधिक्य मिळवून देण्यासाठी भाजपापासून दुरावलेल्या सर्व सहकाऱ्यांना पुन्हा भाजपाच्या प्रवाहात आणून सर्वांना सोबत घेऊन काम काम करू. क्षमता असणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे पक्षाच्या योग्य त्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असेही आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी बोलून दाखवले.

         प्रारंभी तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे यांनी भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात वाडी तांड्यात विविध विकास कामासाठी मोठ्यावदीचा निधी मिळाला असल्याचे बोलून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले, शेवटी गंगासिंह कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमास भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पोहरेगाव, वंजारवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Previous Post Next Post