श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्येतून अभिमंत्रीत केलेल्या अक्षताकलश यात्रेला लातुरात प्रतिसाद
लातूर : श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्येतून अभिमंत्रीत केलेल्या अक्षता कलशाचे पूजन श्री जगदंबा मंदिरात शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे विभाग मंत्री अॅड सुजीत देशपांडे यांच्या हस्ते देवीची पुजा - आरती करुन अक्षता कलश शोभा यात्रेला प्रारंभ झाला.
गंजगोलाई, हनुमान चौक, बस स्थानक या मार्गावरुन ही यात्रा महात्मा गांधी चौकातील श्री महालक्ष्मी मंदिरात पोहोचली. यावेळी श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष राजकुमार झिपरे, उपाध्यक्ष मल्लीकार्जुन घुगरे, पदाधिकारी मन्मथ हुच्चे, राजाभाउ भास्कर, रेवण टाके नारायण झिपरे यांनी शोभा यात्रेतील कलशाचे स्वागत केले .
मंदिरा मध्ये श्री व सौ संदिप सुर्यवंशी, श्री व सौ सुमित पाटील यांनी सात कलाशाचे विधीवत पुजन करुन शहाराच्या विविध भागात दर्शनासाठी ते कलश त्या त्या विभागातील प्रमुख कार्यकर्त्याकडे सुपूर्द केले. यावेळी विश्व हिंदु परिषदेचे लातूर शहर महामंत्री रमण हजारे, प्रखंड प्रमुख, राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शोभा यात्रेत विविध गणेश मंडळाचे, भजनी मंडळ, इस्कॉन आणि विविध देवस्थानचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शोभा यात्रेच्या मार्गावर फटाक्यांची आतिषबाजी येत होती.