सुपर वॉरियर्सच्या माध्यमातून भाजपा महाविजय साकारणार
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लातूर भाजपचा संकल्प
"प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रवास निमित्ताने लातूर शहर भाजपमय पाहण्यास मिळाले. शहरातील सर्वच भागामध्ये पक्षाचे झेंडे डौलाने फडकत होते. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांच्या स्वागताचे फलक संपुर्ण शहरात झळकलेले पाहण्यास मिळाले. शहरात आगमन झाल्यानतर प्रदेशाध्य बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वरुढ शिवाजी महाराज पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर शहर भाजपच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत केले. या स्वागतावेळी ढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आतिषबाजीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. विशेष म्हणजे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी या दौर्याच्या निमित्ताने योग्य नियोजन केली असल्याची चर्चा होत होती."
लातूर /प्रतिनिधी ः- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने धडाकेबाज निर्णय घेत अनेक लोकहिताची कामे केली आहेत. त्याचबरोबर विविध योजनांचा लाखों लोकांना लाभ प्राप्त झालेला असून आगामी लोकसभा निवडणूकामध्ये भाजपा महाविजय साकारणार असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी या महाविजयासाठी लातूरच्या सुपर वॉरियर्सनी आपले योगदान द्यावे असे आवाहन करून या महाविजयाचे शिल्पकार होण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनाला लातूर भाजपाने प्रतिसाद देत महाविजयाचा संकल्प करण्याचा जयघोष यावेळी केला.
लातूर शहरातील स्वानंद मंगल कार्यालयात लातूर शहर, लातूर ग्रामीण व निलंगा मतदारसंघातील आयोजित सुपर वॉरियर्सच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते. यावेळी खा. सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यु पवार, लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, लातूर शहराध्यक्ष देविदास काळे, माजी आ. सुधाकर भालेराव, प्रदेश सरचिटणसी संजय केनेकर, प्रदेश सचिव अरविद पाटील निलंगेकर, लातूर प्रभारी किरण पाटील, लातूर लोकसभा प्रमुख राहुल केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, देविदास राठोड, शैलेश लाहोटी, गुरुनाथ मगे, प्रेरणा होनराव आदींची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनामुळे जनतेत विश्वास निर्माण झाल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, देशाला आत्मनिर्भर करण्याची गॅरंटी मोदींनी घेतली आहे. या गॅरंटीला महाराष्ट्रातील महायुतीची जोड मिळाली असल्याने आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपाचे अधिकाधिक खासदार निवडून येतील असा दावा करून प्रत्येक खासदार 51 टक्के मते घेऊन निवडून येण्यासाठी सुपर वॉरियर्स ही संकल्पना अंमलात आणली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचा आगामी निवडणूकीमध्ये विजय होणार असला तरी त्याचे महाविजयामध्ये रुपांतर करण्यासाठी सुपर वॉरियर्स विजयाचे शिल्पकार ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यात भाजपाचे संघटन मोठ्या प्रमाणात असून भाजपाची ही शक्ती अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे संघटन शक्ती इतर पक्षापेक्षा अधिकची असली तरी या संघटन शक्तीला योग्य ताकद मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. हीच ताकद आगामी काळात लातूर शहर भाजपला देण्यात येईल असा विश्वास देऊन लातूर शहर भाजपाचे काम राज्यासाठी आदर्शदायी असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात होणार्या आगामी प्रत्येक निवडणूकामध्ये भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण पक्ष पदाधिकार्यांना सोबत घेऊन एकत्रीत काम करू असा विश्वास देऊन लातूर शहर विधानसभा मतदारसंघातूनही भाजपचाच आमदार निवडून आणण्यासाठी आतापासूनच ही लढाई हातात घेऊ असे सांगून या लढाईत आपण सर्वांनी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. यावेळी आ. रमेश कराड यांनीही लातूर ग्रामीण सोबतच शहर मतदारसंघातूनही भाजपचाच आमदार निवडून आणण्यासाठी आवश्यक असणारी सर्व ताकद शहर भाजपच्या मागे उभे करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करून लोकसभा निवडणूकीत साडेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येईल असा शब्द देऊन याकरीता सुपर वॉरियर्स सोबत सर्वच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी करावी असे आवाहन केले.
प्रास्ताविकात शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी लातूर शहर भाजपाची संघटनात्मक माहिती देऊन लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचाच आमदार निवडून आणण्यासाठी पक्षाने आम्हाला ताकद द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून लोकसभा निवडणूकीतही भाजपचा खासदार निवडून आणण्यासाठी शहर मतदारसंघाचे सर्वाधिक योगदान असेल असा विश्वास देविदास काळे यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिला.
या बैठकीचे सुत्रसंचलन सरचिटणीस प्रविण सावंत यांनी तर आभार प्रदर्शन खा. सुधाकर श्रृंगारे यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी सरचिटणीस शिरिष कुलकर्णी, अॅड. दिग्विजय काथवटे, मंडल अध्यक्ष अॅड. ललीत तोष्णीवाल, प्रमोद गुडे, संजय गिर, शोभाताई पाटील, अमोल गिते, अबा चौगुले, गोपाळ वांगे, चंद्रकात खटके, महिला मोर्चा अध्यक्षा रागिणी यादव, मिना भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश गोमसाळे, निखील गायकवाड, अजय भुमकर आदींनी योगदान दिले.