लिंगायतांचा महामोर्चा ;
हिंदु लिंगायतांना वाणी नावाचे आरक्षण लागू होण्यासाठी शासनाने शुध्दीपत्रक काढावे - प्रा. सुदर्शनराव बिरादार
लातूर : महाराष्ट्रातील सरसकट लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण म्हणजेच वाणी नावाला लागू असलेले आरक्षण लिंगायत, हिंदु लिंगायत, वीरशैव नावाने जातीची नोंद असणाऱ्या सरसकट लिंगायतांना मिळावे, त्याचे दाखले देण्याचे आदेश सरकारने द्यावेत किंवा वाणी व लिंगायत हे एकच आहेत असे शुध्दीपत्रक काढुन वाणी नावाच्या आरक्षणाचा लाभ लिंगायत व हिंदू लिंगायतांना मिळावा या प्रमुख मागणीसाठी गुरूवार दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वीरशैव लिंगायत समाजाचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा गंजगोलाईतून निघून जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. तिथे मोर्चा थांबवून कांही प्रमुख मंडळी मोर्चाला संबोधीत करतील. व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून हा महामोर्चा संपेल.
वीरशैव लिंगायत समाजावर सातत्याने होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायाविरोधात व मागण्यांच्यासाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून या समाजाला कोणत्याही सरकारने काहीही दिले नाही. महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढा येथील स्मारक १३ जुलै २०११ रोजी मंजुर झाले. तेंव्हापासून १२ वर्षात अनेकवेळेला विधानसमेत निधी देवू, काम सुरू करू अशा घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. मात्र हे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. म्हणून मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचे काम त्वरीत सुरू करावे. ही मागणी महामोर्चात करीत आहोत. तसेच महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची रचना पूर्ण करून महामंडळास २ हजार कोटींचा निधी द्यावा. २०१४ साली शासनाने लिंगायत समाजातील १४ पोट जातींना आरक्षण दिल्याचे सांगितले. मात्र या १४ पोट जातींना पूर्वीच आरक्षण होते अशांनाच आरक्षण जाहीर केले, त्यात वाणी नावाला आरक्षण दिले. मात्र ८० टक्के लिंगायत समाजाच्या कागदपत्रांवरती लिंगायत व हिंदू लिंगायत असणाऱ्या समाज बांधवांना या आरक्षणापासून दूर ठेवले.
आमचे सरकारला विचारणे आहे आरक्षण हे समाजाला द्यायचे आहे की, शब्दाला द्यायचे आहे हे सरकारने ठरवावे. तसेच महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. मराठवाड्यात ७०-७५ मतदारसंघ आहेत. कोणताही पक्ष लिंगायतांना विधानसभेच्या उमेदवाऱ्या देत नाही, विधानपरिषदेवरही एकही सदस्य नाही. त्यामुळे आमची मागणी कोणता आमदार वा खासदार हा संसदेत व विधानसभेत मांडत नाहीत, तसेच या राजकीय दुर्लक्षामुळे लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यांना आरक्षण नसल्यामुळे शिष्यवृत्ती नाही. वस्तीगृहाची सोय नाही. ९५-९६ टक्के मार्क घेवून सुध्दा साधा आकरावीला प्रवेश भेटत नाही. सीईटीमध्ये, नीटमध्ये भरपूर मार्क घेवून सुध्दा इंजिनिअर, मेडीकलला नंबर लागत नाही. आरक्षण नसल्यामुळे नौकऱ्या लागत नाहीत म्हणून आरक्षण मिळविण्यासाठी आता हा पहिला मोर्चा लातूरातून निघत आहे. असे महामोर्चे यापुढे महाराष्ट्रात निघतील. लिंगायत समाजाच्या मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास लोकप्रतिनिधींना व सरकारला आम्ही बेदखल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे सांगण्यासाठीच हा एक प्रकारे आक्रोष मोर्चा आहे. राजकारणात, शिक्षणात व अन्य ठिकाणी लिंगायतांना किंमत दिली जात नाही. त्यांची कामे कोणी करत नाहीत. फुकटात साथ देणाऱ्याची फरफट करणाऱ्या राजकीय नेत्यांची डोके ठिकाणावर आणण्यासाठी हा मोर्चा आहे. तसेच महात्मा बसवेश्वरांचे भाचे चन्नबसवेश्वर यांचे वास्तव्य असलेल्या देवी हल्लाळी ता. निलंगा या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा. तसेच वीरशैव लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका पातळीवर वस्तीगृह सुरू करण्यात यावे. आदि मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात येत आहे.
हा महामोर्चा शि.भ.प. शिवराज नावंदे गुरूजी, प्रदेशाध्यक्ष किर्तनकार, प्रवचनकार मंडळ यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली व लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली निघत आहे. या महामोर्चासाठी शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज औसा, शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीर, गहिणीनाथ महाराज औसा, शिवाचार्य महाराज पाथरीकर, शिवचार्य महाराज वाईकर, शिवाचार्य महाराज वसमतकर, शिवाचार्य महाराज मुखेडकर, शिवाचार्य महाराज निलंगा, शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ, शिवाचार्य महाराज देवणी, शिवाचार्य महाराज अहमदपूर या धर्मगुरूंसह प्रवचनकार लाळीकर महाराज, बालाजी पाटील येरोळकर महाराज, जांबकर महाराज यांच्यासह अनेक किर्तनकार महाराज तसेच सर्वच राजकीय पक्षाचे आजीमाजी नेते तसेच सामाजिक नेते, लातूरातील सर्व संघटना, रुद्र मंडळ, महिला मंडळ, अनुभवमंटप ते 2023%, सेबी यापास, तर्व दुकानदार आदि मंडळी या मोर्चात सहभागी होणार आहेत.