Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अहमदपूर येथील "गुटखा किंग" ला अन्नऔषध प्रशासनातील "विठ्ठला"चा आशिर्वाद!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
अहमदपूर येथील "गुटखा किंग" ला अन्नऔषध प्रशासनातील "विठ्ठला"चा आशिर्वाद!



अहमदपूर -
I.P.S पोलिस अधिकारी निकेतन कदम यांची बदली होताच पोलिसांचे सरेआम धिंडवडे काढणा-या अहमदपूर येथील गुटखा तस्करास अन्नऔषध प्रशासनातील "विठ्ठला"चा आशिर्वाद! असल्याचे आता लपून राहिले नाही त्यामुळे तो उघड माथ्याने गल्लीबोळात गुटखा विक्री करत आहे.हा गुटख्याचा "अश्व" कोण रोखणार..? अन्नऔषध प्रशासनातील अधिकार्याचे हात "मंथलीच्या भिखे" ने बरबटलेले असून वरिष्ठ अधिकारी मात्र बघ्याची भुमिका घेत आहेत.त्यामुळे अहमदपूर मधिल गुटखाकिंग "हा"म्हणे माझे कांहीच वाकडे करु शकत नाही!असे त्यास वाटू लागले आहे.अन्नऔषध प्रशासनातील अधिकार्यांच्या  "भ्रष्टाचाराच्या" भेसळी मुळे अशा गुन्हेगारी स्वरुपाच्या मानसिकतेचे मनोबल वाढत आहे.तो रोज लाखोंरुपयाचा गुटखा शहरात आणून हजारो नागरिकांचे जीव धोक्यात घालत असून अन्न व औषध खात्यासह पोलीस खात्याचेही"अब्रूचे" धिंडवडे वेशीवर टांगत असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.
गुटखा, पान मसाला, फ्लेवरयुक्त सुपारी आणि तंबाखूसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर अंकुश न ठेवल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून त्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.राज्यात गुटखा, पान मसाला, चवदार सुपारी आणि फ्लेवरयुक्त तंबाखूसारख्या प्रतिबंधित उत्पादनांच्या विक्री आणि वितरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असून राज्यात कॅन्सरच्या प्रमाणात वाढ होत आहे. कॅन्सर होण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असल्याचेही  दिसत आहे.तंबाखू अनेक रोगांसाठी कारणीभूत तंबाखू उत्पादनाचे कोणतेही फायदे नाहीत परंतु मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूमुळे फुफ्फुसाचा आणि तोंडाचा ९० टक्के कर्करोग होतो. तंबाखूशी संबंधित आजारांची यादी खूप मोठी असून हृदयविकार, ब्राँकायटिस, दमा, नपुंसकत्व, जन्मदोष यांचा समावेश आहे.त्यामुळे अशा या भयंकर धोकादायक या गुटख्या ला मात्र अन्न सुरक्षा अधिकारी कमयीचे साधन समजत आहेत. यावर वेळीच उपाययोजना नाही केली तर या भ्रष्ट अधिकार्यांचे मुलेही गुटख्यापासुन वंचित राहणार नाहीत हे मात्र तेवढेच सत्य आहे.
Previous Post Next Post