गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
"तुम्हाला काय द्यायचे ते द्या.." म्हणनार्या उपविभागीय कार्यालातील तलाठी दोन हजार रूपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
उदगीर प्रतिनिधी :
"लाच मागणे आणि देणे हे कायद्याने गुन्हा आहे,तरिही लातूर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि आता तलाठी सुध्दा लातलुचपत विभागाच्या जाळयात आडकत आहेत.लातूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक पंडित रेजितवाड यांची दहशत आणि जनजागृति मुळे लाचखोरी कमी झाली परंतू लाच घेण्याच्या मानसिकते मध्ये काही बदल होताना दिसत नाही त्याचे कारण म्हणजे आत्ताच दोन हजार रुपए ची लाच घेताना पकडलेला उदगीरचा तलाठी उमेश तोडकरी होय;लाच तर घ्यायचीय परंतू नाही पण म्हणावे वाटत नाही म्हणून "तुम्हाला काय द्यायचे ते द्या.."असे म्हणाला पण लोकांमधीच एवढी जनजागृति झाली की,तुम्ही कसेही मागा आम्ही तुमची तक्रार करणार..!अशी जनू सर्वसामान्य जनतेने ढोस भुमिका घेतली आहे.अशीच भुमिका सर्वसामान्य नागरिकांनी यापुढे ही घेत राहावी असे अवाहन लाचलुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक पंडित रेजितवाड यांनी केले आहे."
उपजिल्हाधिकारी कार्यालयातील उमेश प्रकाश तोडकरी, वय -42 वर्षे, पद - तलाठी, वर्ग- 3, नेमणूक - तहसील कार्यालय, उदगीर यांनी तक्रारदार यांचे काकूचे नावे मौजे हणमंतवाडी (देवर्जन) ता. उदगीर जि. लातूर येथील गट नं.१०१ मधील शेती पाझर तलावासाठी संपादीत शेतजमीनीचा मावेजाची रक्कम खात्यावर जमा केल्याचा मोबदला म्हणुन 2000 रूपये पुढील अधिकचा मावेजा मिळणे करीता अपिलाची फाईल त्रुटी न काढता पाठविण्यासाठी मदत व मार्गदर्शन करतो म्हणुन दोन पंचासमक्ष "तुम्हाला काय द्यायचे ते द्या.." असे म्हणुन ठरलेली लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार हे आलोसे यांना त्यांचे कार्यालयात जाऊन भेटले असता त्यांनी पंचासमक्ष 2,000/- रु लाचेची रक्कम स्विकारल्याने त्यांना जागीच रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.ही कार्यवाही डॉ. राजकुमार शिंदे,पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेड,रमेशकुमार स्वामी,अपर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो,नांदेड परिक्षेत्र, नांदेड पर्यवेक्षण अधिकारी पंडीत रेजितवाड,पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, लातूर यांच्या सह सापळा अधिकारी व पथक भास्कर पुल्ली,पोलीस निरिक्षक व टीम अँटी करप्शन ब्यूरो, लातूर होती,तपास अधिकारी भास्कर पुल्ली,पोलीस निरिक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, लातूर हे तपास करत आहेत