गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
बेकायदेशीर( Crypto)क्रिप्टो कंपन्यांचा उठणार! बाजार मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत 9 परदेशी( Crypto)क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस
केंद्र सरकारने क्रिप्टो करन्सीसह क्रिप्टो एसेट आणि इतर संबंधित कंपन्यांविरोधात पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणतेही नियम न पाळणाऱ्या या चलनाविषयी केंद्र सरकार पूर्वीपासूनच प्रतिकूल आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने तर हा अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदी सरकारने यापूर्वीच क्रिप्टोतील कमाईवर कर वसूली सुरु केली आहे. आता आणखी एक कारवाई झाली आहे. परदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. देशात या कंपन्यांचे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. या नव्या संकटाने गुंतवणूकदार आणि कंपन्या धास्तावल्या आहेत.
या कंपन्यांवर होणार कारवाई?
याप्रकरणी गुरुवारी अर्थमंत्रालयाने गुरुवारी माहिती अपडेट केली. त्यानुसार, काही कंपन्यांना मनी लाँड्रिंगला कायद्यातंर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये बायनेंस, कुकॉईन, हुओबी, क्राकेन, गेट डॉट बिटरेक्स, बिस्टस्टॅम्प, एमईएक्ससी ग्लोबल आणि बिटफायनेक्स यांचा समावेश आहे. या सर्व 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना भारतीय आर्थिक गुप्तहेर पथकाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.