Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

1.25 लाख लाडूचे श्रीराम भक्तांना होणार वाटप ;रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन

1.25 लाख लाडूचे श्रीराम भक्तांना होणार वाटप ;रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन
 


लातूर : अयोध्येतील प्रभु श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या आनंदसोहळ्या प्रीत्यर्थ सोमवार, दिनांक 22 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता लातूर येथील हनुमान चौकात भव्य स्वरुपात रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठापना दिन सोहोळ्या निमित्त राम भक्तांना सव्वा लाख लाडाचे वाटपही करण्यात येणार आहे.

समस्त प्रभु श्रीराम भक्तजनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचा प्रारंभ सोमवारी सायंकाळी 5.30 वा. प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून होईल. त्यानंतर 5.45 वा. सुप्रसिद्ध गायिका सुचित्रा भागवत यांच्या प्रभु श्रीराम सुश्राव्य गीत गायनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6.30 वाजता श्रीराम जन्मभूमि आंदोलनात सहभाग घेतलेल्या कारसेवकांचा भव्य सत्कार केला जाईल. तसेच 6.45 वा. लोकरंगप्रस्तुत 'रामजी की निकली सवारी' हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

रात्री 8.00 वा. विद्यार्थी व युवकांचा नृत्य वंदना आणि 8.30 वा. सामूहिक रामरक्षा व हनुमान चालीसा पठण व प्रभु श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आनंदोत्सवानंतर उत्सवाचा समारोप भव्य आतिशबाजीने होणार आहे. समस्त लातूरकरानी या राष्ट्रीय आनंदोत्सवात सहभागी होऊन आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post