Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरमध्ये 41 फुट उंच व भव्य थ्रीडी श्रीराम प्रतिमेचा दर्शन व महाआरती सोहळा

लातूरमध्ये  41 फुट उंच व भव्य
 थ्रीडी श्रीराम प्रतिमेचा दर्शन व महाआरती सोहळा


लातूर दि.
अयोध्या येथे होणार्‍या प्रभू श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या आनंद सोहळ्यानिमित्त महात्मा बसवेश्‍वर चौक, लातूर येथे लातूरकरांसाठी 22 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12.20 वाजण्याच्यास सुमारास थ्रीडीच्या स्वरूपातील 41 फुट उंच श्रीराम प्रतिमेचे दर्शन व महाआरती सोहळा सायंकाळी 7 ते 9 च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आनंद सोहळ्यानिमित्त भव्य-दिव्या दीपोत्सव व ऐतिहासिक अतिषबाजीचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या धार्मिक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लातूर शहर व परिसरातील श्रीरामभक्‍तांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन 41 फुट उंच थ्रीडी श्रीराम प्रतिमेचे दर्शन घेऊन महाआरतीसाठी महात्मा बसवेश्‍वर चौक, लातूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धाराशिवचे युवा मोर्चा प्रभारी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.  
Previous Post Next Post