गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
नगर अभियंता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव..!
●न.प.मुख्याधिकारी यांची अभियंत्या विरुद्ध कारवाई
अहमदपूर दि.
येथील नगर परिषदेचे वादग्रस्त नगर अभियंता विजय माने यांना कामामध्ये निष्काळजी पणा तसेच वरिष्ठांशी व जनतेशी वारंवार गैरवर्तन आणी कार्यालयात गैरहजर प्रकरणी वार्षिक वेतनवाढ थांबवावी आणी विनापगारी सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा प्रस्ताव नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी लातूर यांना पाठविण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की,अहमदपूर नगर परिषद येथे कार्यरत असणारे अभियंता विजय माने यांचा कार्यकाळ हा नेहमी वादग्रस्त असाच राहीला आहे.प्रामुख्याने न.प च्या विविध विकास कामावर त्यांचे नियंत्रण असने अपेक्षित असताना ते कामावर जात नाहीत, कार्यालयात येत नाहीत,कंत्राटदारा सोबत संगनमत केल्याने कामाचा दर्जा सूध्दा व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांना अर्वाच्च उद्धट भाषा वापरणे अशा अनेक तक्रारी त्यांच्या आहेत.
या बाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिनांक 9/10/2023 आणी 14/12/2023 रोजी नोटीस दिली मात्र अद्याप पर्यंत त्यांनी खुलासा न देता या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे.त्या मूळे अखेर मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव पाठविला असुन बांधकाम विभागाशी संबंधीत नेमुन दिलेल्या कामात सतत निष्काळजीपणा तसेच वरिष्ठांशी गैरवर्तन, गैरहजर रहाणे आदी बाबी मूळे त्यांची वेतनवाढ थांबवावी आणी विनापगारी सक्तीच्या रजेवर पाठवावे असा प्रस्ताव पाठविला आहे.
त्यामूळे शहरातील त्यांच्या जवळील कंत्राटदारात एकच खळबळ उडाली असून मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचा कर्तव्यदक्षपणा पून्हा एकदा जनतेसमोर आला आल्याने पालिकेतील कामचूकार कर्मचाऱ्यांचे मात्र या घटनेमूळे धाबे दणाणले आले.