कोण आहेत लातूर मधील संभाव्य लोकसभा उमेदवार?
काय आहे भाजपचा खास प्लॅन..!
लातूर-
भाजप नेत्यासाठी नाही, तर पक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असून उमेदवार निवडीतही प्रस्थापितांसाठी धक्कातंत्र वापरले जाण्याचे दाट संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती समोर येत आहे.आता काम करणार्या उमेदवारांनी भले ही ते ईच्छूक असो वा प्रस्थापित त्यांनी मुळीच घाबरण्याचे कारण नसून उमेदवारीसाठी इच्छुकांनी अथवा प्रस्तावित उमेदवारांनी दबावतंत्र वापरल्यास त्यांचा विचार करणार नसल्याची तंबी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असल्याचे आता समोर आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 'महाविजय २०२४' हा खास प्लान हाती घेतली आहे.प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर ठेवण्यात आली असून त्यानुसार राज्यभरात वॉर रूम तयार करण्यात येणार असल्याची माहिती आता लपून राहिली नाही.या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीतीही आखली आहे. त्यानुसार राज्यभरात वॉर रूमचे जाळे तयार केले जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून विधानसभेच्या २८८ आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
वॉर रूमच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत कशी पोहोचतील याची खातरजमा भाजप करणार आहे. याशिवाय भाजप वॉर रूमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघ आणि तेथील उमेदवारांवर लक्ष ठेवणार आहे; तसेच प्रत्येक मतदारसंघातील समस्या आणि विषयांची माहितीही या माध्यमातून घेणार आहे.विधानसभेच्या २८८ आणि ४८ लोकसभा मतदारसंघांत तयारी करत आहे. 'भाजप ३६५ दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे.
लातूर मध्ये सध्या लातूर लोकसभा संभाव्य उमेदवार म्हणून चार उमेदवारांचा समावेश होत आहे त्यामध्ये प्रथमत: खासदार सुधार श्रंगारे , द्वितीय स्थानावर उदगीरचे सुधार भालेराव, तृतीय स्थानावर माजी खासदार सुनिल गायकवाड़ तर चतुर्थ स्थानावर एक कट्टर कार्यकर्ता म्हणून आणि भारतीय जनता पार्टी साठी सरचिटणीस पदावर काम करणार्या र्ॳॅड. दिग्विजय काथवटे यांचे नावे समोर येत आहेत..
हे सर्व उमेदवार आता कामाला लागले असून एक नंबर वर असलेले प्रस्थापित खासदार सुधाकर श्रंगारे यांनी अतिशय आत्मविश्वासाने लातूर लोकसभा उमेदवारी मिळणार असल्याचे गुरुवार दि १२जानेवारी रोजी महायुतीच्या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगीतले आहे.त्याला व्यासपीठावरील आमदार अभिमन्यु पवार, आमदार बाबासाहेब पाटील,आमदार रमेशअप्पा कराड तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ईतर मान्यवर यांनी मुक संम्मती दिली तर मा.आमदार रमेशअप्पा कराड यांनी खासदार सुधार श्रंगारे यांचे "मोकळा माणूस"म्हणुन विशेष कौतूक केले त्यामुळे खासदार सुधार श्रंगारे यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण देश सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. अनेक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या. विविध योजनेचा गरजूंना लाभ मिळाला असून देश मजबूत होण्यासाठी येणाऱ्या काळात मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे आम्ही सर्व जण जिद्दीने, जोमाने कामाला लागलो आहोत असे खा. सुधाकर शृंगारे यांनी यावेळी सांगीतले.
दुसरे संभाव्य लातूर लोकसभा उमेदवार माजी खासदार सुनिल गायकवाड़ हेही काम करत असल्याचे दिसत आहेत. 'मी मोदींच्या आवडत्या पहिल्या दहा खासदारांमध्ये आहे. माझी संसदेत उपस्थिती चांगली होती. भाजप हायकमांडशी चांगले संबंध आहे. त्यामुळे तिकिट मलाच मिळणार, असा दावा डॉ. सुनील गायकवाड करीत आहेत.
परंतू त्यांच्याकडे सध्या कसलीही यंत्रणा नसून ते आपल्या काही खास कार्यकर्त्यांसह लोकसभा निवडणुकीची आखणी करत आहेत.त्यामुळे ते रिगणात असूनही रिंगणात नसल्यासारखेच दिसत आहेत.
तिसरे संभाव्य उमेदवार हे मात्र उदगीरचे माजी आमदार सुधार भालेराव असून त्यांच्या नावाचा विचार झालाच तर त्यांचेही नाव पुढे येऊ शकते ते ही लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समजले असून त्यांनीही चांगली फिल्डिंग लावली आहे परंतू त्यांचे काम उदगीर पर्यंतच सिमीत असल्याचे समोर येत आहे.
यानंतर चतुर्थ स्थानावर ॳॅड. दिग्विज्य काथवटे यांचे नाव प्रकर्षाने समोर येत आहे.सध्या भाजपा चा कल तरुण वर्गाकडे असून भाजपा पुढील तीस वर्षाचा कार्यकाळ डोळयासमोर ठेवून उमेदवार निवडीची प्रक्रीया राबवत आहे अशा वेळी सुशिक्षित, स्वच्छ चेहरा मिळाला तर त्याचा विचार केला जाणार असल्याचे सांगीतले जात आहे. या दृष्टीने ॳॅड.दिग्विजय काथवटे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचेही समजत आहे. ॳॅड. दिग्विजय काथवटे यांना भारतीय जनता पार्टी ने सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली त्यासोबतचं ते 'महाविजय २०२४'च्या मराठवाड़ा संयोजक पदी काम पाहत आहेत.
ॳॅड. दिग्विजय काथवटे हे उच्चशिक्षित असून त्यानी परदेशात शिक्षण घेतलेले आहेत ते एवढ्यावरचं नं थांबता मागील काही वर्षा पासून ते सातत्याने काम करत आहेत.विशेष म्हणजे ते तरुण आहेत. विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. त्यांची कोरी पाटी असून, वक्तृत्व,काम करण्याची जिद्द,कार्यकर्त्यांमध्ये जवळीकता या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, यामुळे पक्ष गांभीर्यानी या पर्यायाचा विचार करत असल्याचे सांगीतले जात आहे.परंतू लातूर लोकसभा निवडणुकी मध्ये उमेदवारासाठी असलेले दिग्गज आजी माजी खासदार, आमदार यांच्या समोर नेमके कोणाचे नाव समोर येईल हे वेळचं ठरवेल.