प्रभु श्रीराम लोकार्पण सोहळ्या दिवशी बीड जिल्ह्यातील मटन-दारुची दुकाने बंद ठेवावीत
पालकमंत्री-जिल्हाधिका-यांना निवेदन
【आयोध्या नगरीतील रामलल्लाच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा प्राणप्रीय--सुनिल सिरसाट】
•••••••••••••••••••••••••••••••••••••
(अंबाजोगाई-प्रतिनिधी)-- उद्याच्या २२ जानेवारीला अयोध्या नगरीत अखंड हिंदुस्थानी-भारतीय नागरिकांचे आणि जगभरातील अनिवासीयांचे श्रध्दास्थान अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा अख्ख्या हिंदुस्थानासह जगभरातील विविध ठिकाणी साजरा होणार असून, संबंध हिंदुंचे स्वप्न तब्बल ५०० वर्षाच्या संघर्षानंतर पुर्ण होत आहे. यानिमित्ताने सबंध देशामध्ये अतिशय आनंदाचे-उत्साहाचे वातावरण आहे.
प्रभू श्रीराम हे हिंदू धर्माचे श्रध्दा-आस्थास्थान आणि प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे सर्वांचे प्रेरणास्रोत प्रभु रामचंद्रांच्या या न भुतो...न भविष्यती...! अशा ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त सबंध देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जाणार असून अर्थातच आपल्या बीड जिल्ह्यात देखील वस्ती-वाड्या-गाव-तांडे आणि शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जल्लोष साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने सर्व समाज बांधवांमध्ये शांतता, एकोपा अबाधित राहावा आणि या अद्भुत अद्वितीय सोहळ्याचा एक उत्तम सामाजिक संदेश राज्यभर-देशभर जावा. मटन-दारुची दुकाने केवळ एकदिवस बंद ठेवल्याने काहीही फरक पडणार नाही. परंतु हे केल्याने या दैदिप्यमान सोहळ्याला कसलेही अपवित्र गालबोट लागणार. कारण आपापल्या परीने जळी-स्थळी महिला मंडळ, वारकरी संप्रदायातील मंडळी जागोजाग भजन फे-या, लहान मुलांच्या विविध वेशभूषा परिधान करून प्रभात फे-या काढणार असल्याने कुठेही मटन-चिकन-दारुची दुकाने उघडी राहिल्याने कुणाच्या भावना दुखू नयेत, भडकू नयेत. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री ना.धनंजयजी मुंडे आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ.दिपा मुधोळ-मुंडे यांनी पालक या नात्याने या दिवशी संपुर्ण बीड जिल्ह्यात सर्वत्र अगदी कडेकोटपणे सर्व मांस (मटन) व मद्य (दारु) ची दुकाने बंद ठेवण्यासाठी तात्काळ संबंधित जिल्ह्यातील सर्व महसुल अधिकारी व विशेषतः राज्य उत्पादन शुल्क विभागाला आदेशित करून आणि समस्त हिंदु समाजाच्या व हिंदू बांधवांच्या, वारकरी संप्रदायच्या भावनांचा आणि होणा-या अविस्मरणीय सोहळ्याचा आदर करावा अशी मागणी अखंड हिंदूराष्ट्र संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजपाचे मराठवाडा ग्रामविकास-पंचायतराज विभागाचे सह-संयोजक, नरेंद्र मोदी विचारमंचाचे बीड जिल्हाध्यक्ष आणि श्री बागेश्वर धाम महाराष्ट्र सेवा समितीचे बीड जिल्हा सचिव *श्री.सुनिल सिरसाट* यांच्या आणि अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज संस्थान व सावतामाळी भजनी मंडळाच्या वतीने आज तहसीलदार-उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना निवेदन देऊन यांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनास आणि पालकमंत्री यांना केली आहे. यावेळी निवेदन देण्यासाठी सुनिल सिरसाट यांच्यासोबत जेष्ठ पत्रकार प्रकाशजी बोरगावकर, विश्व वारकरी संघ व भजनी मंडळ ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवर्य अच्युत महाराज जोशी, ह.भ.प.दिलीपजी भांगडिया, ह.भ.प.पद्माकर महामुनी, ह.भ.प.संजय अंकुलवार ह. भ.प.योगेश स्वामी, ह.भ.प.शुभम तिवारी, ह.भ.प.अमोल घोडके, ह.भ.प.बंकट बैरागी, नगरसेवक डॉ.अतुलजी देशपांडे, विकासजी मुंडे, दत्तप्रसाद रांदड, विष्णु पांचाळ, दत्तप्रसाद गोस्वामी, ॲड.बळीराम पुरी, ॲड.अशोक मुंडे, ॲड.मोटेगावकर, गणेशमामा काळे, राणा चव्हाण, श्रीपाद कुलकर्णी, अनंत मलवाड, मनोज महिंद्रकर, महेश वेदपाठक, संदिप निकम, शंकर मोगले, बद्रीनाथ बुरांडे, निकेश जगदाळे, निलेश उहाळे, प्रविण दासुद, श्रीकांत कावळे, ओम चव्हाण ई. रामभक्त मंडळींची उपस्थिती होती.