लातूर शहरात खासदारांना" श्रीरामांचा" विसर
शहर सोडून...तालुक्यात उत्सव
लातूर -मागील दिड वर्ष अज्ञात वासात गेलेले लातूरचे खासदार सुधाकर श्रंगारे हे सध्या हवेत असून अचानक काम करण्याची उर्जा त्यांच्या अंगात संचारली आहे. संपुर्ण भारतातचं नव्हे तर जगात श्री रामांचा उत्सव मनवत आहेत ,केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. . 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत आस्थापनेला सुट्टी असेल. देशभरात २२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जाणार आहे. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे.रामललाचा अभिषेक 22 जानेवारीला अयोध्येत होणार असून देशभरात याचा उत्साह संचारला आहे.परंतू लातूरच्या खासदारांना मात्र याचा विसर पडला आहे.ते रामलल्ला चे स्वागत करत आहेत परंतू ते अहमदपूर येथे ,पंधरा हजार स्क्वेअर फूट मध्ये दिव्यांनी भव्य प्रभू श्री रामचंद्राची कलाकृती बनवणार असून श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र प्राणप्रतिष्ठेनिमित्त लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्यातर्फे रामदरबाराच्या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच लातूर शहरामध्ये मात्र रामलल्ला च्या स्वागतासाठी कसल्याही प्रकारे काम करताना दिसत नाहित..
शहरातील उत्सवाची जबाबदारी सध्या नागरिकांनी स्त:च हतात घेतली आहे.जागोजागी बॅनर पोस्टर लावून उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. ते साधे भोळे आहेत यात काही शंका नाही परंतू आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याची कल्पना त्यांना नाही हे मात्र त्यांना समजत नाही असे वाटत नाही.त्यांच्याजवळील पीए असो की बाॅडीगार्ड ह्यांनी मात्र खासदारांवर हिप्नोटाइज केले असल्याचे दिसत आहे.साधे निवेदन असो कि खासदार फंडाचे पत्र ,ते पहिले कचरा कुंडीत टाकतात आणि आपल्याजवळील लोकांनाच याचा लाभ मिळवून देत आहेत त्यामुळे बर्यांच गावाला फंड मिळू शकला नाही,किंबहुना गावातील प्रतिष्ठित लोकांना आपमाण सहन करावा लागला आहे.
आता संपुर्ण जग श्री रामांचे स्वागत करत असताना मात्र लातूर शहराकडे खासदारांचे दूर्लक्ष होत आहे.त्यांचे पुर्ण लक्ष सध्या अहमदपूर,लोहा या मतदारसंघावर दिसत आहे त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये विशेषतः राम भक्तांमध्ये तिव्र नाराजी निर्माण झाली आहे.जागो जागी रामभक्तांनी प्रसादवाटपाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत,कोणी एक लाख लाडू वाटप करत आहेत तर कोणी खिचडी वाटप करत आहेत परंतू आपल्या खासदारांचा मात्र साध्या पाण्याचा स्टाॅल सुध्दा लावणार असल्याचे कुठे बॅनर दिसत नाही एकंदरीतचं लातूर शहरात खासदारांना" श्रीरामांचा" विसर पडला असून शहर सोडून...ते तालुक्यात उत्सवाची जय्यत तयारी करत असल्याचे दिसत आहेत.
याचे नेमके कारण राजकिय आहे का...लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांच्या सोबत असलेले त्यांचे संबंध लपून राहिले नाहित,एका कार्यक्रमा मध्ये भर सभेत "भैया माझ्या वर लक्ष ठेवा" असे म्हणल्याचे वाक्य संपुर्ण लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाले होते.त्यामुळेच ते शहरात काही करत नाहित का..?अशी शंका निर्माण होत आहे.