Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूरमधील "रेशन" चा काळाबाजार चालवणारा"फेरोज" आता नादेड मध्ये दाखल!

लातूरमधील "रेशन" चा काळाबाजार चालवणारा"फेरोज" आता नादेड मध्ये दाखल!
प्रतिकात्मक 


सरकारच्या माध्यमातून कोरोना काळापासून सर्वसामान्य व गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत आहे. मात्र, हेधान्य नागरिकांच्या उपयोगात येत नसून सर्रासपणे स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री करीत आहेत.यामध्ये "फेरोज"नामक व्यक्तिचा हात असल्याचे आता उघड बोलले जावू लागले आहे.विशेष म्हणजे ज्या कंत्राटदाराला हे काम लातूर मध्ये मिळाले होते त्याच कंत्राटदाराला नांदेड़ मध्ये काम मिळाले असून ,त्या कंत्राटदाराचा सुपरवाइजर म्हणुन तो काम पाहत आहे.मागील कित्तेक वर्ष त्याने लातूर मधील गोरगरिबांचा तोंडचा घास हैदराबाद पासून ते गुजरात, मध्यप्रदेश पर्यंत धान्याची काळयाबाजारात विक्री केली आहे.डिसेंबर मध्ये आता लातूरचे कंत्राट संपल्यामुळे आता त्यास नांदेड चे कंत्राट मिळाले आहे.
अधिकारि पासून ते संबंधीत पोलिसांपर्यंत न चुकता हप्ता देत असणारा हा "फेरोज"नांदेड मध्ये धडकला आहे.तेथील अधिकारी आणि कर्मचार्यांनी आता वेळीच सावध होवून नजर ठेवण्याची आवश्यकता बनली आहे.

शासकीय धान्याचा काळाबाजार मागील अनेक दिवसांपासून त्याने सुरू ठेवला आहे.त्याची काम करण्याची पध्दत आश्चर्यचकीत करणारी आहे.ज्या गाड्यांमधून धान्याची वाहतूक करायची आहे त्या गाड्यांना जीपीएस लावणे बंधनकारक असताना तो लावत नाही.रात्रीच्या वेळेस गोडावून किपर ला हाताशी धरून लाखों टन धान्य काळयाबाजारात विकतो त्याने यासाठी काही लोकांची फौजच तयार केली आहे.यांच्या माध्यमातून तो मध्यप्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकत असल्याची चर्चा आहे.

यासंदर्भात स्थानिक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने  याप्रकरणात अद्याप कुठल्याही व्यापाऱ्यांवर व दुकानदारावर कारवाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावर लगाम लावण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
Previous Post Next Post