Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पंतप्रधान मोदीजींच्या प्रयत्नातून देशात पुन्हा रामराज्य निर्माण झाले - खा.सुधाकर श्रृंगारे

पंतप्रधान मोदीजींच्या प्रयत्नातून देशात पुन्हा रामराज्य निर्माण झाले
- खा.सुधाकर श्रृंगारे




लातूर दि.22-01-2024
संपूर्ण जगामध्ये आज सगळीकडे आनंदोत्सव साजरा होत आहे. प्रभू श्री रामचंद्र हे हिंदू धर्माचे त्रिलोकातील मानवाचे प्रेरक होते. त्यामुळे महामानव व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रयत्नातून आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशावरून आज अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जे 500 वर्षात शक्य झाले नाही ते माजी पंतप्रधान अटलबिहार वायपेयी, लालकृष्ण अडवाणी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून शक्य झाले आहे. आज खरी रामराज्याची प्रचिती सर्व रामभक्‍तांना आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून आज देशात खरे रामराज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन सर्व प्रभू रामचंद्राच्या भक्‍तांनी यशस्वी वाटचाल करावी असे प्रतिपादन लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केले.
यावेळी ते महात्मा बसवेश्‍वर चौकामध्ये आयोजित 41 फुट उंच थ्रीडी प्रतिमेचा दर्शन सोहळा व महाआरती प्रसंगी बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला माजी खा.डॉ.गोपाळराव पाटील, भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट समितीचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे, भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, सौ. आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर, विश्‍वजीत पाटील कव्हेकर, निळकंठराव पवार, इस्कॉनचे युगल प्रेमप्रभू, धर्मराज प्रभू, लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर सुरेश तात्या पवार, दिग्वीजय काथवटे, भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश कार्यकारिणीचे मुन्‍नाभाई हाश्मी ज्योतीराम चिवडे,प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारूती सूर्यवंशी, भाजपा महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षा रागिणीताई यादव, मिनाताई भोसले, बस्वराज बिराजदार, भाजपा अनुसुचित जाती विभागाचे गोविंद खरटमोल,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संतोष सोमवंशी, राहुल अंधारे, मनोज डोंगरे, पुण्य नगरीचे वृत्त संपादक राम जेवरे, सकाळचे वृत्तसंपादक हरी तुगावकर, शरणप्पा अंबुलगे, प्राचार्य शैलेश कचरे, प्रा.सतिष यादव, रागिणी यादव, डॉ. विठ्ठल लहाने, पारीख शेठ, कारसेवक प्रदीप कुलकर्णी, गुरूप्रसाद हुंडेकर, बालाजी शेळके, विक्रम भांबरे, संजय गिर, संतोष तिवारी यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना खा.सुधाकर श्रृंगारे म्हणालेे की, आज अयाध्येमध्ये प्रभू श्री राम चंद्राची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हा आपल्या सर्वांच्या दृष्टिने आनंदाचा क्षण आहे. 2019 मध्ये राम मंदिराबाबत निकाल लागला यावेळी सर्वांची इच्छा होती की अयाध्येमध्ये भव्य-दिव्य असे राम मंदिर झाले पाहिजे. प्रभू श्रीरामाचा आदर्श सर्वांनी पाहिला. आई वडिलांच्या सांगण्यावरून रामाने 14 वर्ष वनवास स्वीकारून भरत राजाला गादीवर बसविण्याचे काम केले. या प्रक्रियेला आज 500 वर्ष पूर्ण होऊनही अयाध्येमध्ये राम मंदिर उभारण्याचे काम झाले नव्हते, परंतु ते सत्कार्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी करून दाखविले आहे. सर्वांबरोबरच रामालाही अयाध्येमध्ये हक्‍काचे घर म्हणून राम मंदिर उभारण्याचे काम केलेले आहे. या त्याठिकाणी आज सर्व जाती धर्मांच्या भक्‍तांना प्रभू रामचंद्राची पूजा आर्चा करण्याचे सद्भाग्य उपलब्ध करून दिलेले आहे. या राज्यातून रामभक्‍त कांबळे व लातूरातील भटक्या मुक्‍तातातील गायकवाड यांना अयोध्येमध्ये पूजा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापणा दिन दिवाळी म्हणून साजरा करा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी 51 दाम्पत्यांच्या उपस्थितीत होमहवन व 300 मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी कार्यक्रमाची प्रास्ताविक भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. प्रारंभी अयाध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी योगदान दिलेल्या कारसेवक व इतर मान्यवरांचा प्रभू रामचंद्राची प्रतिमा व वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 41 फुट उंच भव्य थ्रीडी श्रीराम प्रतिमेचे अनावरण करून श्रीरामभक्‍तांच्या दर्शनाची सोय करण्यात आली व शेवटी प्रभू श्रीरामाची घोषणा व अतिशबाजीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाची सुत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला लातूर शहर व परिसरातील प्रभू श्री रामभक्‍तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्रभू रामचंद्र त्रिलोकाचे आदर्श असून त्यांच्या विचारावर वाटचाल करा
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
सर्वांचे श्रद्धास्थान, कल्याणकारी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक रामभक्‍त आपला आनंद हा दिवाळी, स्वातंत्र्यदिनाप्रमाणे साजरा करीत आहे. त्या प्रमाणे हा आनंद घेऊन देशाचे पंतप्रदान नरेंद्र मोदी प्रभू श्रीरामचंद्राची हनुमंताप्रमाणे सेवा करीत आहेत. प्रभू रामचंद्रही कुठल्याही एका समाजापुरते सिमीत नव्हते तर सर्व समावेशक होते. प्रभू रामांनी 14 वर्ष वनवास केला. त्याबरोबरच रावण दुर्जनांचा वध करून बिभीषणाच्या मदतीने रामराज्याची स्थापना करून 11000 वर्ष रामराज्य केले. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या विचारातून महात्मा बसवेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रभक्‍त स्वामी विवेकानंद घडले. त्यांच्या विचारातून प्रेरणेतून अन्यायाचा प्रतिकार व राष्ट्र उभारणी आणि मानव कल्याण करण्याची उर्जा मिळते. त्यामुळे प्रभू रामचंद्र हेच त्रिलोकाचे आदर्श असून त्याच विचारावर सर्वांनी यशस्वी वाटचाल करावी असे आवाहन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
------------------------------------------------------------
Previous Post Next Post