आ.रमेशअप्पा कराड यांच्या उपस्थितीत नवमतदार संमेलनास मोठा प्रतिसाद
युवकांच्या भवितव्यासाठी घराणेशाही नष्ट करा - प्रधानमंत्री मोदी
लातूर दि.२५- लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात आयोजित नवमतदार संमेलन मोठ्या उत्साहाच्या आणि जल्लोषपूर्ण वातावरणात भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत पार पडले या नव मतदार संमेलनास युवाशक्तीचा मोठा प्रतिसाद मिळाला. घराणेशाही पार्टीने कधीच दुसऱ्या तरुणांना पुढे येऊ दिले नाही तेव्हा तरुणांच्या भवितव्यासाठी येणाऱ्या काळातील निवडणुकीत घराणेशाहीच्या पार्टीला पराभूत करावे असे आव्हान देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने २५ जानेवारी रोजी देशभर नवमतदार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या सर्व संमेलनास दूर दृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नव मतदारांशी संवाद साधला. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील नवमतदाराचे संमेलन भाजयूमोचे प्रदेश सचिव ऋषिकेश कराड यांनी लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात आयोजित केले होते. या संमेलनास नवमतदारासह तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. याप्रसंगी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड आणि जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नव मतदारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणाले की येणाऱ्या २५ वर्षाचे विकसित भारत देशाचे आणि आपले भवितव्य निश्चित करण्याची जबाबदारी नवमतदारावर आहे. विकासाला गती देण्यासाठी नव तरुणाच्या मतदानात मोठी ताकद आहे, स्पष्ट बहुमतातील स्थिर सरकार असेल तरच मोठे आणि योग्य निर्णय होऊ शकतात. केंद्र सरकारने अशक्य असणारी कामे शक्य करून दाखवली आहेत. मोदी है तो ग्यारंटी है असे सांगून केंद्र शासनाने घेतलेल्या विविध निर्णयाची सविस्तर माहिती दिली आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे संकल्प पत्र कसे असावे यासाठी तरुणांनी सूचना कराव्यात असे आव्हान केले.
भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गोरगरीब, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम झाले असल्याचे बोलून दाखवले. गेल्या नऊ वर्षात देशाचा सर्वांगीण चौफेर विकास झाला. शेतकऱ्यांना, महिलांना आणि तरुणांना विविध योजनेच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात आणले. देशाची शान आणि मान नरेंद्रजी मोदी यांनी जगात उंचावली. वर्षानुवर्ष अडगळीत पडलेले प्रश्न निकाली काढले अशा नेतृत्वाच्या पाठीशी नव मतदारांनी खंबीरपणे उभे राहुन भक्कम समर्थन दिले पाहिजे असे आव्हान भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी केले.
प्रारंभी युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांनी नव मतदार संमेलनाच्या योजना मागची भूमिका विशद करून तरुणांनी मोदी ॲपच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याशी थेट संपर्कात यावे असे आवाहन केले. या नवमतदार संमेलनास लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नव मतदार युवाशक्ती हजारोच्या संख्येने उपस्थित होती. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या संमेलनात तरुणांनी नरेंद्र मोदी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है !! यासह जय श्रीराम, जय जय श्रीराम, मोदी.. मोदी.. मोदी.. अशा जोश पूर्ण घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमास भाजपाचे नवनाथ भोसले, अनिल भिसे, सतिष अंबेकर, वसंत करमुडे, भागवत सोट, सुकेश भंडारे, सुरज शिंदे, अमर चव्हाण, संजय ठाकूर, अशोक सावंत, रावि माकुडे, भागवत गिते, गोविंद देशमुख, गणेश तुरुप, प्रताप पाटील, ज्ञानेश्वर जूगल, विजय चव्हाण, किशोर काटे, सचिन लटपटे, सुभाष पवार, शिला आचार्य, शुभम खोसे, लक्ष्मण खलंग्रे, दिलीप पाटील, बाबुराव कस्तूरे, नरसिंग येलगटे, चंद्रकांत माने, कार्तिक गंभिरे यांच्यासह इतर अनेकजण नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित होते