आगामी लोकसभा व इतर निवडणूकीच्या पुर्वतयारीसाठी
काँग्रेस पक्षाची लातूरमध्ये विभागीय बैठक
लातूर दि. २८ जानेवारी २०२४
आगामी लोकसभा व इतर निवडणूकीच्या पुर्वतयारीसाठी काँग्रेस पक्षाची
विभागीय बैठक सोमवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता लातूर येथील
हॉटेल ग्रॅट सरोवर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाचे
महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पक्षाचे
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी
पक्ष नेते विजय वडेटटीवार, महीला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या
सव्वालाखे यांच्यासह मान्यवर नेते मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीस लातूरसह छत्रपती संभाजी नगर, जालना, नांदेड, हिगोली, परभणी,
बीड, धाराशीव जिल्हयातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित
राहणार आहेत. आगामी निवडणूकीसाठी स्थापन केलेल्या बुथ, प्रभाग, ग्राम
कमिटी संदर्भात या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे.
या बैठकीस पक्षाचे वरीष्ठ नेते संपतकूमार, शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील,
सुरेश वरपूडकर, अमर राजूरकर, नसीम खान, राजेश राठोड, वजाहत मिर्झा
यांच्यासह राज्यातील तसेच मराठवाडयातील नेते, माजी खासदार, माजी आमदार
आदी मंडळीही उपस्थित राहणार आहेत.
देशात वाढलेले महागाई, बेरोजगारी, भृष्टाचार यामुळे राज्यातील आणि
देशातील जनता सत्ताधाऱ्यावर प्रचंड नाराज आहे. या परिस्थितीत जनतेचे मुळ
प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्यासाठी सत्ताधारी मंडळी जाती जातीत भांडणे
लावण्याचे काम करीत आहे. धार्मिक वातावरण निर्माण करून त्या माध्यमातून
निवडणूका जिंकण्याचा सत्ताधाऱ्याचा डाव आहे. त्यांचा हा डाव उधळून
लावण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून नियोजनबध्द प्रयत्न केले जात आहेत. या
नियोजनाचा भाग म्हणून मराठवाडा विभागाची काँग्रेस पक्षाची बैठक लातूर
येथे होत आहे.
लातूर जिल्ल्हा काँग्रेस व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कडून या विभागीय
बैठकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. लातूर शहरात काँग्रेस पक्षाचे
झेडे, नेते मंडळीच्या स्वागताचे होर्डींस लावले असून माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज देशमुख या एकूण तयारीवर लक्ष ठेऊन
आहेत. काल सांयकाळी बैठकीच्या ठिकाणी केलेल्या तयारीचा आढावाही घेतला
आहे.
लातूरच्या परंपरेला शोभेल अशा पध्दतीने बैठकीचे नियोजन पार पाडावे यासाठी
शहर व जिल्हा काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी कार्यरत आहेत.
जिल्हयातील सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांना बैठकी संबंधी माहीत
दिली असून या सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे
अध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.किरण जाधव यांनी
केले आहे.