Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्हा लॅबोरेटरी टेक्निशीयन जिल्हाध्यक्षपदी प्रदिप शिंदे

लातूर जिल्हा लॅबोरेटरी टेक्निशीयन जिल्हाध्यक्षपदी प्रदिप शिंदे


लातूर ः असोसिएशन ऑफ क्लिनीकल लॅबोरेटरी आनालाईट्स अँड प्रॅक्टिसनर्स, लातूर (अउङअझ) लातूर जिल्ह्यातील लॅबोरेटरी टेक्निीशियनची दि.29 डिसेंबर 2023 रोजी बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे लातूर जिल्हाध्यक्षाची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी बैठकीचे अध्यक्ष साजीद पटेल व दत्तात्रय अपसिंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रतिनिधी शंकर काळे, लातूर जिल्हाध्यक्षपदी प्रदिप शिंदे, उपाध्यक्षपदी विनोद लोमटे, मोहन जाधव, सचिव सलीम शेख, कोषाध्यक्ष सत्तार ताशेवाले, संघटकपदी अवधूत मगर, प्रसार माध्यमप्रमुखपदी हिराप्रकाश कांबळे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत लॅबटेक्निशियनच्या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आल्या. यावेळी येणार्‍या काळात आपण कशा प्रकारे कार्य करायचे व नवनवीन तंत्रज्ञानासोबत अवगत राहून आपण रूग्णांना कशा प्रकारची उत्तम सेवा देवू याविषयीही सखोल असे मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले. लातूर जिल्ह्यामध्ये टेक्निशीयन बांधवांना नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास व माहिती देण्यासाठी सएमईच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. हा कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात नवजीवन कॉन्फरन्स हॉल येथे पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने लॅबेटेक्निशीयन बांधव उपस्थित होते.
Previous Post Next Post