रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत १५१ महाविद्यालयीन युवक युवतींना मोफत हेल्मेट वितरण
लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन, परिवहन विभाग आणि शहर पोलिस वाहतूक शाखेचा अनोखा उपक्रम*
लातूर : जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन, परिवहन विभाग आणि शहर पोलिस वाहतूक यांच्या संयुक्त विद्यमाने म.बसवेश्वर महाविद्यालयातील १५१ युवक-युवतींना मोफत हेल्मेटचे वाटप करून राज्य रस्ता सुरक्षा अभियानात आपला सहभाग नोंदविला.
राज्य सुरक्षा अभियानांतर्गत १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत.
म. बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. संजय गवई यांची तर उद्घाटक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रमुख अतिथी म्हणून ट्रॅव्हल्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल देशपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, शहर वाहतूक पोलिस निरिक्षक गणेश कदम, मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी, शांताराम साठे, विशाल यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वच मान्यवरांनी उपस्थित विदयार्थी विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षा विषयक नियम पाळण्याचे आवाहन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील १५१ तरूण तरुणींना हेल्मेट वितरीत करण्यात आले. यानंतर रस्ता सुरक्षा नियम पाळण्याची शपथ सभागृहात उपस्थित सर्वांना देण्यात आली. रस्ता सुरक्षा अभियानात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल परिवहन विभागाच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक शितल गोसावी, शांताराम साठे, विशाल यादव आणि शहर वाहतूक पोलिस निरिक्षक गणेश कदम यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशपांडे यांनी केले तर आभार डॉ. जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी मानले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम लोंढे, झाकीर सय्यद, सोमनाथ मेदगे, नरेश घंटे, गोविंद दायमा, सागर वाडकर, शफीक चौधरी, प्रितेश भंडारी, दत्तराम कराड, विश्वास कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.