जय श्रीरामच्या घोषणांनी लातूर दुमदुमले प्रभू श्रीरामांच्या ६० फूट उंच प्रतिमेचे लोकार्पण
लातूर शहर भाजपच्या वतीने ५१ हजार लाडूंच्या महाप्रसादाचे वाटप
लातूर/प्रतिनिधी: अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण लातूर शहर 'जय श्रीराम'च्या घोषणांनी दुमदुमले.शहर भाजपच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांनी लातूर शहराला प्रति अयोध्येचेच रूप प्राप्त झाले.छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामांच्या ६० फूट उंच प्रतिमेचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहर भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२२ )विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमांना रामभक्त लातूरकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी प्रभू श्रीरामांच्या ६० फूट उंच प्रतिमेचे लोकार्पण राज्याचे क्रीडा व युवक कल्याण,बंदरे मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमास खा.
सुधाकर शृंगारे,लोकसभा प्रमुख किरण पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,शहर भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे,गुरुनाथ मगे,अजित पाटील कव्हेकर,रवी सुडे,शिरीष कुलकर्णी,
विवेक बाजपाई,
प्रविण कस्तुरे,प्रेरणा होनराव,रागिनीताई यादव यांच्यासह सर्व मंडल प्रमुख,विविध मोर्चांचे प्रमुख,प्रकोष्ट प्रमुख यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान चालिसा पठण करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कारसेवकांचा सत्कार करण्यात आला.शहर भाजपाच्या वतीने श्रीराम मूर्ती स्थापने निमित्त ५१ हजार लाडूंच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचा शुभारंभही उपस्थित मान्यवरांनी केला.
भारतीय जनता पक्ष व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांनी केले.
प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेनिमित्त आयोजित या सर्व उपक्रमात भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.