भैया तुमची पिल्लावळ संभाळा ...पक्षातील नामांकित पदावर बसलेल्या काही व्यक्ति मुळे,लातूर काॅंग्रेस पक्षाची प्रतिमा होतेय मलिन!
लोकसभा निवडणुका जश्या जश्या जवळ येत आहेत तश्या तश्या एस.सी साठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातील हालचाली वाढत असून पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून इच्छुकांची गर्दी वाढत आहे.भाजपाने लातूर जिल्ह्यामध्ये कामाच्या जोरावर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 'महाविजय २०२४' हा खास प्लान हाती घेतली आहे.प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर ठेवण्यात आली असून त्यानुसार राज्यभरात वॉर रूम तयार करण्यात येणार असल्याची माहिती आता लपून राहिली नाही.या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीतीही आखली आहे. त्यानुसार राज्यभरात वॉर रूमचे जाळे तयार केले जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून विधानसभेच्या २८८ आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
वॉर रूमच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत कशी पोहोचतील याची खातरजमा भाजप करणार आहे.यातून भाजपा कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचे आणि पक्षाचे नाव कसे मोठे होईल हे पाहत आहेत परंतू लातूर मधील काॅंग्रेस पक्षामध्ये तसे होताना दिसत नाही उलट पक्षातील नामांकित पदावर बसलेले कार्यकर्ते मात्र काॅंग्रेस पक्ष भुईसपाट कसा होईल याकडे लक्ष देवून आहेत त्याचे कारणही तसेच आहेे. प्रथम विक्रांत गोजमगुंडे यांच्यावर अट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर पाखरसांगवी गटातील जमीन हडप प्रकारणात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे व त्यांच्या पी.ए वर काही दिवसापुर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत लातूर सह संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.या प्रकरणामुळे संपुर्ण महाराष्ट्रात काॅंग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन झाली झाली.मोक्याची जागा दिसली की साम,दाम दंड वापरून ती हडप करायची, असे अनेक प्रकार गेली अनेक दिवसांपासून लातूर परिसरात सुरू आहेत.एखादया जागेत कांही तांत्रिक अडचण असेल किंवा एखादे कागदपत्र कमी असले,किंवा आरक्षित जागा असली की त्याला बाजूला करणे, एखादी मोक्याची जागा आवडली की ती ताब्यात घेणे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या नजरेतून काॅंग्रेस पक्षाबरोबर मा.अमित देशमुख यांचे नावही बदनाम होत चालले आहे.माननिय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरच नव्हे तर महाराष्ट्रातूनही विरोधक ठेवले नव्हते,ते त्यांच्या बोलण्याच्या शैलीने...परंतू आपल्या ताफ्यातील या पिल्लावळांनी विरोधकतर सोडाचं परंतू आगदी जवळील कार्यकर्त्यांपासून ते काही पत्रकारांना सुध्दा दुर केले आहे . त्यामुळे भैया तुमची पिल्लावळ संभाळा ... नाहितर लातूर लोकसभा निवडणूकित काॅंग्रेस पक्ष भुईसपाट होण्याच्या मार्गावर जाईल आणि तुम्हाला काहीच करता येणार नाही,मग भविष्यात तुमच्याकडे पर्याय छोट्या बंधुंना मोकळे सोडून कमळाचा सहारा घ्यावा लागेल! कारण तुम्ही मात्र एकनिष्ठ आहात, हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.