गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
राष्ट्रीय बजरंग दलाने मारले जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला लातूरात जोडे.
लातूर दि 04 जानेवारी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीराम यांचा बद्दल केलेल्या विधानाने हिंदु धर्मातील देवी देवतांचा अवमान झाला असुन हा अवमान सहन केला जाणार नाही असे सांगत राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतिने शहरातील गांधी चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या फोटो असलेल्या बॅनर ला जोडे मारुन आंदोलन केले आहे. हे आंदोलन राष्ट्रीय बजरंग दल विभाग अध्यक्ष आकाशजी मसाने यांच्या नेतृत्वात आज दुपारी चार वाजता करण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा सुरक्षा प्रमुख विजय घोडके, लातूर शहर उपाध्यक्ष अमोल साळूंके, तालुका अध्यक्ष विष्णू मामडगे, शंकर नागभूजे, निखिल चोथवे, व्यंकट मोरे, निलेश गायकवाड, अमोल जाधव, गणेश कवटाळे, किशोर स्वामी, व कार्यकर्ते उपस्थित होते.