Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लोकशाहीचा चौथा असलेल्या पञकार वाघमारे यांच्यावर प्राणघातक हल्ला

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लोकशाहीचा चौथा असलेल्या पञकार वाघमारे यांच्यावर प्राणघातक हल्ला. 



लातूर -
काटगाव जिल्हा परिषद शाळेतील तिन दलित विद्यार्थिनींना शौचालय साफ करायला लावल्याचा धक्प्रकादायक प्रकार घडला असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची बातमी  करण्यासाठी पोलीस क्राईम न्युज चे संपादक पञकार डि एल वाघमारे हे काटगाव शाळेत गेले असता , आमच्या शाळेची इज्जत घालवतोस का? म्हणत मुख्याध्यापक व गावातील सरपंचाने बेदम मारहाण करुन बेहोश केले असल्याचे समजले असून धक्पकादायक बाब म्हणजे पत्रकार  वाघमारे बेहोश अवस्थेत 2 तास घटनास्थळावर पडुन होते. त्यांना कोणतीच मदत वेळेत भेटली नाही. हे वृत्त लातूर येथील पञकारांना समजताच रुग्ण वाहिकेची मदत घेऊन त्यांना लातूरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असुन प्रकृती अस्थिर आहे. वैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत.यावर आता पोलिस प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी लातूर येथील पत्रकारांकडून होवू लागली आहे.
Previous Post Next Post