औशात आ.पवारांच्या साक्षीने महंत व हजारो महिला, युवकांच्या उपस्तितीत श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
औसा - दि. २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा आनंद औसा शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी ९ वा आमदार अभिमन्यू पवार, महंत राजेंद्रगिरी महाराज, ष. ब्र. १०८ निरंजन शिवाचार्य महाराज, श्रीरंग महाराज औसेकर व शहरातील प्रमुख संतमंडळींच्या हस्ते शहरातील औसा मंदिरात महाआरती करण्यात आली.
त्यानंतर हजारो महिला व तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात श्रीराम मंदिर औसा ते हनुमान मंदिर औसा भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा सामुहिक पठण करण्यात आले.रामजन्मभूमी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविलेल्या कारसेवकाचा तसेच दिवंगत कारसेवकांच्या वारसांचा आ.अभिमन्यु पवार यांच्या हस्ते अयोध्या येथून आणलेल्या श्रीराम मुर्ती, हनुमान चालीसा, भगवा गमजा व टोपी घालून सन्मानित करण्यात आले.अयोध्या नगरीत संपन्न झालेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण वीर हनुमान मंदिर समोर रामभक्ताना पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली यामध्ये शहरातील हजारो राम भक्त सहभागी झाले होते. तसेच या सोहळ्यात सहभागी झालेल्या राम भक्ताला गांधी चौक येथील हिंगोली अंबिका मंदिरात महाप्रसादाची सोय करण्यात आली. याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. किरण उटगे, समीर डेंग,बंडू कोद्रे,बाळू सोनवळकर, गोपाळ धनुरे,सदानंद शेटे,जगदीश परदेशी,धनराज परसने,सागर भंडारी,रेवण भागूडे, नितीन शिंदे श्रीराम जन्मोत्सव समिती,व सर्व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हणाले की मतदारसंघातील पाच हजार रामभक्तांना टप्प्या टप्प्यात अयोध्याचे दर्शन घडवून आणले जाणार असून आपण भाग्यवान आहोत जो हा क्षण आपणास पाहण्यास मिळाला आहे. यासाठी हजारो कारसेवकांनी आपली आहुती दिल्याचे त्यांनी सांगितले