Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

आ.रमेशआप्पा कराड यांनी पत्रकारांना श्री रामांचे मुर्ती भेट देवून;प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात रामभक्तानी सहभागी होण्याचे केले अवाहन

आ.रमेशआप्पा कराड यांनी पत्रकारांना श्री रामांचे मुर्ती  भेट देवून;प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात रामभक्तानी सहभागी होण्याचे केले अवाहन 






आयोध्‍या येथील श्रीराम मंदिराकरीता १९९० साली झालेल्‍या कारसेवेत सहभागी झाल्‍याबद्दल चंद्रकांत सुर्यकांत कातळे यांचा भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांनी प्रभू रामाची मुर्ती देवून सत्‍कार केला.

       लातूर दि.२० - आयोध्येत प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर व्हावे हे हजारो वर्षांपासून पाहिलेले स्वप्न देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात २२ जानेवारी रोजी सत्यात उतरत आहे. यानिमित्ताने देशातच नव्हे तर जगभरात मोठा आनंद उत्सव साजरा होत आहे तेव्हा रामभक्तानी, जनतेनी घरोघरी दीपावली साजरी करून या आनंद उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

          लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे विक्रमकाका शिंदे, तुकाराम गोरे, महेंद्र गोडभरले, अनिल भिसे, भागवत सोट, अॅड. दशरथ सरवदे बन्सी भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

        प्रदीर्घ संघर्षानंतर प्रभू श्रीराम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराची उभारणी आयोध्या नगरीत होत आहे. या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील गावागावात मोठा आनंद उत्सव साजरा केला जात असून लातूर जिल्ह्यातील जनता ही उत्स्फूर्तपणे या आनंद सोहळ्यात सहभागी होत आहे असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील जवळपास साडेपाचशे हून अधिक विविध देव देवतांच्या मंदिरात स्वच्छता करण्यात आली. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, गावागावात भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाश कंदील दिवे मोठया प्रमाणात लावले जात आहेत, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे एकूणच सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले आहे.

        २२ जानेवारी नंतर प्रत्येकाच्या घरी प्रभू श्रीरामाची पूजा व्हावी यासाठी २१०० रामाची मूर्ती आणि मिठाई वाटप करत असल्याची सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, पत्रकार बंधूंनी या उत्सवात सहभागी व्हावे उत्सवाच्या विविध कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. रामेश्वर ता.जि. लातूर येथील माझ्या जन्मगावी प्रभू रामाचे भव्य मंदिर आहे, या मंदिरातही २२ जानेवारी रोजी मोठा आनंद उत्सव साजरा केला जात असून यानिमित्ताने सकाळी ९ वाजता शोभायात्रा सकाळी ११ वाजता परमपूज्य महंत रामकृष्ण महाराज शास्त्री यांचे कीर्तन, त्यानंतर आयोधीतील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार असून, महाप्रसादानंतर कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तेव्हा याही कार्यक्रमास रामेश्वर आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले आहे.

            आयोध्‍या येथील श्रीराम मंदिराकरीता १९९० साली झालेल्‍या कारसेवेत सहभागी झाल्‍याबद्दल चंद्रकांत सुर्यकांत कातळे यांचा भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांनी प्रभू रामाची मुर्ती देवून सत्‍कार केला.
Previous Post Next Post