गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
उदगीर येथील भाखसखेडा गावातील मनोरुग्न इसम लातूरमधून बेपत्ता;कोणास आढळल्यास गांधी चौक पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन
नामे शेषेराव लिग्राम गायकवाड चय ५६ वर्ष व्यवसाय चालक रा. मुंबई हा. मु. गंगापुर ता. उदगीर, जि.लातूर यांनी अर्ज दिला की, त्यांचा मनोरुग्न भाच्चा नामे नवनाथ प्रकाश कांबळे वय ३३ वर्ष रा. भाखसखेडा (पश्चिम) पोष्ट करडखेल ता. उदगीर जि.लातूर यास दिनांक ०५/१२/२०२३ रोजी नियमीत तपासणीसाठी शाहू कॉलेज जवळील दिनेश पाटील यांचेकडे घेऊन आलो होतो तेथे वेळ लागणार असल्याने शाहू कॉलेजचे बाजुस असलेले तिरुपती हॉटेलवर नाष्टा करुन बील देत असताना नवनाथ प्रकाश कांबळे कोणास काहीएन न सांगता निघून गेला आहे. वगैरे अर्जा वरुन पो.स्टे. गांधीचौक लातूर मिसींग नंबर ५९/२०२३ प्रमाणे दाखल आहे. सदर बेपत्ता मनोरुग्न इसमाचे वर्णन:- १. नवनाथ प्रकाश कांबळे चय ३३ वर्ष रा. भाखसखेडा (पश्चिम) पोष्ट करडखेल ता.उदगीर २.रंग गोरा, ३.उंची -५.५ फूट ४. बांधा- सडपातळ ५. नाक सरळ ६. चेहरा- गोल ७. अंगात- बदामी रंगाचा शर्ट आणि से रंगाची पॅन्ट, गळयात पांढऱ्या रंगाचा गमजा नेहमीच टाकतो ८. पायात- प्लास्टीकची चप्पल ९. भाषा मराठी अशा वर्णनाचा मनोरुग्न इसम बेपत्ता आहे पोलीस निरीक्षक श्री प्रेमप्रकाश माकेाडे -१२८४२८८५११७. पोह/९५७ बी.एस.डापकर मो.नं. ९७६७१०८४७७
पोशि/६०९ जी.एम. देवकते -९८८११५१६०१
पो.स्टे. गांधी चौक, लातूर ०२३८२-२४२१००