888
गुन्हेगारीचा पर्दाफाश….!हाळी मध्ये एलसीबीच्या धाडी मुळे आवतरला "विठ्ठल"... जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या"गोल्ड" गुटख्याच्या होलसेल डिलरवर कार्यवाही करुनही तीच परिस्थिती
उदगीर -उदगीर तालुक्यातील हंडरगुळी हे गाव राज्यात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या विकण्यासाठी "फेमस" होत चालले आहे.नुकतेच लातुरच्या एलसीबी पथकाने दि २८ डिसेंबर रोजी दुपारी १च्या सुमारास एका किराणा दुकानात "रेड" करुन 24 हजार रु. चा गुटखा पकडला त्यात फिर्यादी विठठल सटवाजी लोंढे यांच्या तक्रारीवरुन आरोपी रामदास चिंतलवार यांच्यावर कार्यवाही करण्यात आली परंतू त्यानंतर नविन वर्षा मध्ये पुन्हा "हरी ॐ " म्हणत व "खाकी" ची सरे -आमपणे अब्रुचे लक्तरे काढत खुलेआम गुटखा विक्री चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या"गोल्ड" गुटख्याच्या होलसेल डिलरवर कार्यवाही करुनही तीच परिस्थिती असेल तर मग धाडीचे नाटक करता कशाला..!का..?हे हे धाडीचे नाटक म्हणजे "मंथली"चे आकडे वाढवण्यासाठीतर नाहीत ना?असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे आरएमडी,रजनिगंधा,बाबा रत्ना 120/300 तसेच विमल,गोवा, राजनिवास,यासारख्या मातब्बर गुटखा सोडून गोल्ड" गुटख्याची लातरसह उदगीर आणि हाळी परिसरात धुम असुन याचा मेन होलसेलर मात्र सध्या मोकाट फिरत आहे.लातूरसह उदगीर परिसरातील पानटपरी बिनबोबाट गुटख्याची विक्री होत आहे त्यामुळे सरेआम "खाकी वर्दी" ची बेअब्रू करुन खुलेआमपणे गुटखा विकणा-यास "आधार" देतोय तरी कोण?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.अन्न सुरक्षा अधिकारी मात्र आपल्या "मंथली"च्या हव्यासापोटी निष्पाप तरुण वर्गांचा जीव घेत आहे.अशा या गोल्ड"गुटखासह अन्य गुटखा होलसेल करणार्यावर आता वेळीच कार्यवाही नाही केली तर दिवसेंदिवस पैशाच्या जोरावर तरुण मु़लांचा जीव मात्र गेल्या शिवाय राहणार नाही.
888