गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रेणापूर पोलिस गुन्हा दाखल करण्यास करतायत टाळाटाळ; मृतांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन
लातूर प्रतिनिधी:-रेणापुर तालुक्यातील कामखेडा येथील अभय अनुरथ सुर्यवंशी रा.कामखेडा या तरूणांचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता.अभय अनुरथ सुर्यवंशी यांचा खून झाला झाला असल्याचा संशय नातेवाईकांना असून सबंधित आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी वडील चुलते व इतर नातेवाईक यांनी १५जानेवारी रोजी सायंकाळी ७वाजता पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अभय अनुरथ सुर्यवंशी यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता त्याचा खून झाला झाला असल्याचा संशय नातेवाईकांना असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा कशी मागणी नातेवाईक करत आहेत परंतू रेणापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अनंत्रे हे मात्र टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहेत.त्यांच्याकडे अनेक वेळा जाऊन सुद्धा गुन्हा दाखल केला नाही .त्यामुळे नातेवाईकांनी रेणापूर पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी चाकुर, पोलिस अधीक्षक लातूर यांच्या कडे तक्रार करुन परत अधीक्षक यांनी सांगुन सुद्धा पोलिस निरीक्षक गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत .तेथील ठाणे अंमलदार यांनी अर्ज आपण वरीष्ठ कडे द्या उपविभागीय पोलिस अधिकारी चाकुर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या कडे द्या आम्ही घेणार नाही पोच देणार नाही असे आम्हाला साहेबांनी सांगितले आहे असे म्हणतातच नातेवाईक यांचा राग अनावर झाला व पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले.पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांना निलंबित करण्यात यावे संबंधीत आरोपीवर गुन्हा दाखल तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी १६ जानेवारी रोजी पोलिस स्टेशन रेणापूर समोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत असा इशाराही देण्यात आला.