Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्हाधिकारी मॅडम पत्रकार भवन ताब्यात घ्या..! लातूर जिल्हा पत्रकार भवन ची दयनीय अवस्था;आंधळ दळतयं.. अन् कुत्र पिठ खातय!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हाधिकारी मॅडम पत्रकार भवन ताब्यात घ्या..!
लातूर जिल्हा पत्रकार भवन ची दयनीय अवस्था;आंधळ दळतयं.. अन् कुत्र पिठ खातय!



लातूर -माननिय विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात लातूर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांनी पत्रकारांना बसण्याची आणि पत्रकार परिषदेसाठी जागा उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील पत्रकारांची होत असलेली परववड थांबावी यासाठी माननीय विलासराव देशमुख यांच्या निदर्शनास आनून दिली.त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आतील बाजूस जागा देण्यात आली, ते बांधण्यातही आले परंतू पुढील काळात पत्रकार संघाची निवडणूक होवून अध्यक्ष पदामध्ये बदल झाला जेष्ठ पत्रकारांना डावलून नविन पत्रकारांना संधी देण्यात आली.२०१८ रोजी हि निवडणूक झाली.या निवडणूकी दरम्यान निवडीच्या वेळी बराच गोंधळही झाला त्यानंतर नरसिंह घोणे हे अध्यक्ष म्हणुन विराजमान झाले.मुळचे उदगीर येथील असलेले नरसिंह घोणे अल्पावधीतच लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाले.पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकारनी तयार करण्यात आली परंतू ही कार्यकारनी नावालाच होती सर्व कारभार हा ..एकला चलो रे.. चाच असल्याचे आता समोर आले आहे.विशेष म्हणजे मागील अध्यक्षांपासून ते या अध्यक्षांपर्यंत सदस्य नोंदनी च्या पैशाचा हिशोबचं नाही.पत्रकारांच्या अपघात विमा देखील काढला आहे की नाही?अशी शंका आता जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे.त्याहुन पुढे म्हणजे ज्या हेतू साठी पत्रकार भवन उभा राहिले आहे त्या उद्देशाला केराची टोपली दाखवून पत्रकारांचे बसण्याचे कार्यालयचं किरायाने देण्यात आल्याने संपुर्ण पत्रकारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे एवढ्यावरचं नं थांबता पत्रकार भवन च्या मागील रिकामी जागाही एका हाॅटेल साठी देण्यात आले या जागेंचा किराया लाखोंच्या घरात येत आहे परंतू पत्रकारांना मात्र याचा काडीचाही उपयोग होत नाही.आता तर हद्दचं झाली आहे ते म्हणजे अध्यक्षांचा कार्यकाल संपून तब्बल तिन वर्ष उलटत आहेत तरी राजीनामा देवून निवडणून लावण्यात आली नाही..या सर्व अनागोंधी कारभारांमुळे लातूर जिल्हा पत्रकार भवन ची दयनीय अवस्था झाली असून;आंधळ दळतय अन् कुत्र पिठ खातय! असे चित्र दिसत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी मॅडम.. पत्रकार भवन आपल्या ताब्यात घेवून प्रशासन नेमावे व मागील दहा वर्षाच्या कार्यकालातील हिशोबाची चौकशी करावी अशी मागणी आता पत्रकारांमध्ये जोर धरु लागली आहे.
Previous Post Next Post