"प्रभू श्रीराम" चौकाचा भाजपा जिलाध्यक्षांना विसर
लातूर -प्रदीर्घ संघर्षानंतर प्रभू श्रीराम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराची उभारणी आयोध्या नगरीत होत आहे. या मंदिरात येत्या २२ जानेवारी रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील गावागावात मोठा आनंद उत्सव साजरा केला जात असून लातूर जिल्ह्यातील जनता ही उत्स्फूर्तपणे या आनंद सोहळ्यात सहभागी होत आहे.जवळच दयानंद गेट जवळ अतिशय चमकदार विद्युत रोशनाई सह पताके,बॅनर,रंगरंगोटी करुन चौक पुर्ण पणे सजवण्यात आला आहे परंतू लातूर शहरामध्ये उषाकिरण पेट्रोल पंपाजवळ असलेल्या चौका ला" प्रभू श्रीराम"चौक आहे हे बहूतेक लातूर भाजपा जिलाध्यक्ष देवीदास काळे यांना विसर पडला आहे.लातूर शहरातील जवळपास शंभर हून अधिक विविध देव देवतांच्या मंदिरात स्वच्छता करण्यात आली.परंतू "प्रभू श्रीराम"चौकाचा साधा बोर्ड ही साफ करण्यात आला नाही त्याहुन अधिक धक्कादायक म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजलि असलेले बॅनर पण तसेच आहेत.एकिकडे अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाश कंदील दिवे मोठया प्रमाणात लावले जात आहेत, सर्वत्र राममय वातावरण निर्माण झालेले असताना मात्र या "प्रभू श्रीराम"नावाच्या चौकाची असलेली दुर्दैवी स्थीती पाहुन श्रीराम भक्तामध्ये प्रचंड नाराजगी पसरली आहे. या चौकात एका काॅंग्रेसच्या नगरसेवका सोबत भाजपा उपाध्यक्षांची नेहमी बैठक असते बहूतेक त्यांच्यावर त्यांचा परिणाम झाला की काय? अशी शंका आता रामभक्तांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे २२ जानेवारी रोजी प्रत्येकाच्या घरी प्रभू श्रीरामाची पूजा करुन एतिहासिक आनंद उत्सव साजरा होत असताना मात्र या आनंदाचा साक्षीदार हा "प्रभू श्रीराम"चौक होईल का??यात आता शंका व्यक्त होत आहे.जर हा चौक या श्रीराममय वातावरणाचा साक्षीदार नाही झाला तर याचा फटका नक्कीच जिल्हाध्यक्षांना बसणार अशी चर्चा श्रीराम भक्तांमध्ये होवू लागली आहे.