Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर ग्रामीण भाजपाच्या २०२४ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

लातूर ग्रामीण भाजपाच्या २०२४ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन




       लातूर दि.०३- भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या वतीने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे छायाचित्र असलेल्या २०२४ या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपाचे नेते राजेश कराड यांच्या शुभहस्ते आणि भाजपाच्या प्रमुख लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

          लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचे छायाचित्र आणि संपूर्ण परिपूर्ण माहिती असलेली २०२४ या नवीन वर्षाची दिनदर्शिका लातूर ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या वतीने तयार करण्यात आली आहे. या दिनदर्शिका भाजपा नेते राजेश कराड यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.

        दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे अँड. दशरथ सरवदे, बन्सी भिसे, वसंत करमोडे सतीश आंबेकर, गोविंद नरहारे, साहेबराव मुळे, उमेश बेद्रे, बाबासाहेब भिसे, सुधाकर गवळी, गोपाळ पाटील लक्ष्मण नागिमे, प्रताप पाटील, भैरवनाथ पिसाळ, चंद्रकांत कातळे, गोपाळ शेंडगे, पांडुरंग बालवाड, ज्ञानोबा भिसे, गंगासिंह कदम, रमाकांत फुलारी, ज्ञानेश्वर जुगल, धनराज शिंदे, विनायक मगर, किशोर काटे, शुभम खोसे, समाधान कदम, अविनाश रणदिवे, राम बंडापल्ले, आदिनाथ मुळे, प्रशांत पाटील, धनराज जाधव, शिला आचार्य श्रीमंत नागरगोजे, सचिन लटपटे, बाबुराव कस्तुरे, सायस कराड, शेख निजाम, किरण मुंडे, हनुमंत कापरे, लक्ष्मण खालंग्रे, ईश्वर बुलबुले, पप्पू गुट्टे, पद्माकर होळकर, किशोर गुट्टे यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post